कोल्हापूर! ग्रामपंचायत सदस्याचा खून अनैतिक संबंधातून, चौघांना अटक…

कोल्हापूर: एका गुन्ह्यात नवरा जेलमध्ये गेल्यानंतर पत्नीने बचत गटात कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर तिचा गैरफायदा घेत शारिरीक संबध ठेवून तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तसेच विविध पोलिस ठाण्यात केसेस करून त्रास देत असल्याने सराईत टोळीने बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा हात पाय तोडून आणि शीर सुद्धा धडावेगळ करून हिरण्यकेश नदीत फेकून दिल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे.

लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून तो रांगोळी (ता. हातकणंगले) गावाचा ग्रामपंचायत सदस्य होता. तो गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याने बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर आठ दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. खून प्रकरणी चार संशयतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी खुनाची कबूली दिली. लखन बेनाडे याची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अनेक महिलांना त्याने छळून त्यांचा गैरफायदा घेतला होता. त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल होते. महिलांनी रील करून त्याच्या अत्याचाराचा पाढा वाचला होता.

पोलिसांनी लक्ष्मी विशाल घस्ते (वय 36, रा. राजेंद्रनगर), आकाश उर्फ माया दिपक घस्ते (वय 21 रा. तामगाव ता करवीर कोल्हापूर), संस्कार महादेव सावर्डे (वय 20 रा. देवाळे ता. करवीर कोल्हापूर), अजित उदय चुडेकर ( वय 29 रा. राजकपुर पुतळा, जुना वाशी नाका कोल्हापूर) यांना अटक केली असून गुन्ह्याची कबूली दिली आहे.

बेपत्ता लखनचा शोध घेताना विशाल गस्ते हा उजळाईवाडी येथील अर्जेंट कार वॉश सेंटरमध्ये मिळाला. त्याच्याकडे लखनची चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच विशालने दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी पोलीस ठाणेच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेल्याची माहिती दिली. त्यावेळी पत्नी लक्ष्मी हिने लखन बेनाडेकडे बचत गटातून कर्ज मागणीसाठी गेली होती. लखनने तिचा गैरफायदा घेत शरीर संबंध ठेवले व व्हिडीओ करुन व्हायरल करण्याची धमकी देत होता. लखनने अनेक ठिकाणी तक्रार केल्या होत्या.

लखन 10 जुलै रोजी कोल्हापुरात शाहुपुरीत आल्यानंतर लक्ष्मीला फोन करून दिलेल्या तक्रारी मागे घेतो तू बरोबर चल असे म्हणून बोलावले. त्यावेळी विशालला सुद्धा लक्ष्मीने फोन करून बोलावले. यावेळी विशाल येताच लखनने लक्ष्मीला मारहाण केली व निघून गेला. त्यानंतर विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी राजेंद्रनगर जाताना लक्ष्मीने ठार मारण्यास विशालला सांगितले. यावेळी लखन सायबर चौकात होता. विशालने साथीदारांना बोलवून लखनचा काटा काढायचा असे ठरवले. आरोपींनी लखन बेनाडेचा सायबर चौकमधून तवेरा कारमधून पाठलाग सुरु केला. पाठलाग करुन त्याला शाहु टोल नाका जवळून जबरदस्तीने तवेरा मोटारीत बसवले. महामार्गाने संकेश्वरच्या हद्दीत नेत खून केला. त्यानंतर त्यांनी तुकडे पोत्यात भरून हिरण्यकेशी नदीत फेकले होते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आहे.

प्रियकर दिराने महिलेला जाळण्याआधी काय-काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड…

धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध…

हृदयद्रावक! आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरवलं अन् बहिणीची पण सोडली साथ…

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!