लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटाल याची हत्या…

लाहोर (पाकिस्तान): मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड, लष्कर-ए-तोएबाचा प्रमुख हाफिज सईदचा उजवा अबू कटालची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. त्याशिवाय आणखी एकाला कंठस्नान घालण्यात आले आहे. ही व्यक्ती हाफिज सईद असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या घटनेने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि पाकिस्तानी हँडलवर हाफिज सईदवर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हाफिज सईद ‘एक्स’वर ट्रेंडिंगमध्ये आहे. जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम भागात मारला गेला आहे, असा दावा अनेक अकाउंटवरून करण्यात आला. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही.

हाफिज सईद हा पंजाबमधील झेलम येथे जात असताना त्याच्यावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जवळचा दहशतवादी अबू कटाल सिंधी जागीच ठार झाला. यामध्ये चालकाचाही मृत्यू झाला. तर अनेक पाकिस्तानी ट्विटर हँडल दावा करतात की हाफिज सईद देखील या कारमध्ये होता. तो गंभीर जखमी झाला आणि त्याला रावळपिंडी येथे नेण्यात आले. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली नाही.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हाफिजचा निकटवर्तीय अबू कटाल याचा खात्मा करण्यात आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील झेलममध्ये शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी अदांधुंद गोळीबार केला. यामध्ये कटाल ठार झाला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसून तो दहशतवादी कारवाया करत असे. कटाल ठार झाल्याने दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती हाफिज सईदला मारण्यात आल्याचा दावा करत आहे. झेलम परिसरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. रावळपिंडी रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की फैजल नदीम उर्फ ​​अबू कटाल सिंधीची हत्या झाल्याची पुष्टी झाली आहे, परंतु त्याच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, ज्याची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, रेल्वे हायजॅक ; 6 जवान ठार, प्रवासी ओलीस…

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…

भारतातील युवतीचे पाकिस्तानी युवकासोबत ऑनलाइन लग्न; पुन्हा भारतात परतली अन्…

पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा बसवर अंदाधुंद गोळीबार…

पाकिस्तान हादरला! पोलिस अधिकाऱ्यासह ५२ ठार; शेकडो जखमी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!