मटणाची उधारी तब्बल ६१ लाख रुपये; गुन्हा दाखल…

पुणे : लष्कर परिसरात असलेल्या एका मटण विक्रेत्याकडे तब्बल ६१ लाख रुपयांची मटणाची उधारी थकली होती. उधारी न दिल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

मटण विक्रेत्याने लष्कर पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी अफझल युसूफ बागवान आणि अहतेशाम अयाज बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनी मटण विक्रेत्याची मटणाची ६१ लाख रुपयांची उधारी देण्यास टाळाटाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अफझल आणि अहतेशाम यांनी हॉटेलसाठी या मटणाची खरेदी केली होती.

हॉटेलसाठी दररोज मटण, चाप, खिमा, गुर्दा इत्यादी लागत असे. दोघेही लष्कर परिसरात असलेल्या एका मटण मार्केटमधून मटण विकत घ्यायचे. विक्रेत्याकडून २०१९ ते २०२३ या चार वर्षांच्या कालावधीत दोन कोटी ९१ लाख ८१ हजार रुपयांचे मटण त्यांनी खरेदी केले होते अशी माहिती विक्रेत्याने तक्रारीत दिली आहे. दोघांनी एकूण उधारीपैकी २ कोटी ३० लाख १९ हजार रुपये परत केले होते. पण ६१ लाख ६२ हजार रुपये इतकी रक्कम शिल्लक होती. ही रक्कम देण्यास हॉटेलचालकाकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर, मटण विक्रेत्याने पोलिसात धाव घेत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लष्कर पोलिस करत आहेत.

kashmir

पुणे शहरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच केली मित्राची हत्या…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

पुणे शहरात लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू…

पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…

पुणे शहरात पत्नीने चिकन न दिल्याने चिमुकलीच्या डोक्यात घातली वीट…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!