पत्नीला मृत समजून अंत्यसंस्कारही केले; पण फोन सुरू होता…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एका महिलेला मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण, ती महिला दुसऱ्या शहरामध्ये जिवंत सापडली. पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी या महिलेला तिच्या घरी पोहोचवले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांसगांवचे रहिवासी के राम सुमेर यांची पत्नी फूलमती (वय 40) 15 जून रोजी बेपत्ता झाली होती. 19 जून रोजी उरुवा मार्केटमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं समजून सुमेर यांनी तिच्या मृतदेहावर अंतिम संस्कारही केले. शवविच्छेदन तपासणीत महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी फुलमतीचा मोबाईल फोन ट्रेस केला असता तो गोरखपूरपासून 600 किमी अंतरावर असलेल्या झाशी जिल्ह्यात सक्रिय आढळून आला. कॉल डिटेल रेकॉर्डमध्ये (सीडीआर) शुभम नावाच्या व्यक्तीच्या नंबरवर सतत संभाषण झाल्याचे समोर आले.

शुभम याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, फुलमती जिवंत आहे आणि त्याने तिला गोरखपूरहून झाशीला आणले होते. त्यानंतर पोलिसांना शुभमने सांगितलेल्या ठिकाणी फूलमती सापडली. फुलमतीची जबानी नोंदवल्यानंतर तिला तिच्या पतीसह परत पाठवण्यात आले आहे.राम सुमेर, फूलमती, शुभम आणि ज्या महिलेवर अंतिम संस्कार करण्यात आले त्या महिलेचे काय संबंध होते याचा पोलिस तपास करत आहेत.

घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…

धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…

सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…

धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…

प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!