सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…

लखनौ (उत्तर प्रदेश) : अलीगड येथून होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूला उत्तर प्रदेश पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली आहे. दोघेजण नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. चौकशीदरम्यान सासू सपना उर्फ अनिताने जावयासह पळून जाण्याचे कारण सांगितले आहे. दोघांना मडराक पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. यादरम्यान चौकशी करण्यात आली असता, दोघांनी धक्कादायक खुलासे केले.

सासू सपना उर्फ अनिताने जावयासह पळून जाण्याचे कारण सांगताना यापुढे जावयासह राहण्याची इच्छा व्यक्त केली. दरम्यान पती मारहाण करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिस चौकशीत अनिताने सांगितले की, पती जितेंद्र कुमार दारू पिऊन तिला दररोज मारहाण करायचा. मुलीचं लग्न राहुलशी ठरलं तेव्हा त्याचे फोन येऊ लागले. जेव्हा ती राहुलशी बोलू लागली तेव्हा मुलीने शंका व्यक्त करायला सुरुवात केली. ती विविध प्रकारचे आरोप करायची. नवरा शिवीगाळ करायचा. अशा परिस्थितीत मला माझ्या जावयासह पळून जावे लागले. नवरा आणि मुलगी राहुलसोबतच्या अनैतिक संबंधांबद्दल बोलू लागले. जेव्हा मी राहुलला हे सांगितलं तेव्हा त्याने माझं दुःख समजून घेतलं. मग, मला राहुल आवडू लागला. आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मी राहुलवर प्रेम करते आणि करत राहीन. मला माझे उर्वरित आयुष्य राहुलसोबत घालवायचं आहे. घरातून दागिने आणि रोख रक्कम पळवून नेल्याचा आरोप खोटा असल्याचे सांगितले. टोमण्यांना मी कंटाळले होते. म्हणून मी राहुलसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे.’

राहुलने सांगितले की, ‘सपनाला 6 एप्रिल रोजी अलीगढहून कासगंजला घेऊन आला. मग बसमध्ये चढलो आणि बरेलीला पोहोचलो. यानंतर तो बिहारमधील मुझफ्फरपूरला गेला. दोन दिवसांपूर्वी मी माझा मोबाईल सुरु करुन पाहिलं तेव्हा सोशल मीडियावर आमच्या प्रेमसंबंधाबद्दल बरीच चर्चा सुरू होती. आम्ही मुजफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. तिथून नेपाळ सीमेवर पोहोचलो. आम्ही नेपाळला जाणार होतो पण पोलिसांनी आम्हाला पकडले. 10 दिवसांत अनेक ठिकाणे बदलली.’

दरम्यान, दोघांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या राहुलच्या मेहुण्याने पोलिसांसमोरे धक्कादायक खुलासा केला होता. तो म्हणाला की, राहुलची पळून जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, राहुल शेजारच्या गावातील एका महिलेसोबत पळून गेला होता. त्यावेळी महिलेच्या कुटुंबाने कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…

सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने काढला सासूचा काटा; कारण आले समोर…

सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…

सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!