पुणे शहरातील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी…

पुणे (संदिप कद्रे): दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, दुचाकी चोरणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण ०३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ०१ दुचाकी गाडी, ०१ ऑटो रिक्षा व ०१ चारचाकी गाडी जप्त केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्तांनी पुणे शहरामध्ये दुचाकी वाहनांचे चोरीला आळा बसावा याकरीता विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार असे वारजे माळवाडी पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ३६५ / २०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व चोरीस गेले दुचाकी गाडीचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार ८७३२ साईकुमार कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फेतीने बातमी मिळाली की, म्हाडा कॉलनी २ नंबर पार्किंगच्या समोरील पत्र्याच्या आडबाजुस, रामनगर, वारजे माळवाडी, पुणे येथे असलेल्या मोकळया मैदानाजवळ चोरलेल्या ह्युंडयाई सँट्रो कारसह थांबला आहे. सदरची चारचाकी सँन्ट्रो कार ही चोरीची असलेबाबतची बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून सापळा रचला. नमुद मुलाचे ताब्यात मिळुन आलेल्या चारचाकी सँन्ट्रो कारचे आर.टी.ओ. नंबरवरुन माहिती काढली व गुन्हे अभिलेखावरील अभिलेख पाहता सदर ऑटो रिक्षाबाबत वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा रजि नं ३६५ / २०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद असलेबाबत माहिती समजल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालकांसमक्ष आणखी चौकशी करता त्याने ०१ दुचाकी गाडी व ०१ ऑटो रिक्षा असे चोरी केल्याचे सांगितल्याने नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन एकूण ०३ वाहने जप्त करुन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३६५ / २०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
२) वारजे माळवाडी पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि.नं. ३६१ / २०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
३) येरवडा पोलिस स्टेशन, पुणे शहर, गुन्हा रजि. नं. ६३९ / २०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२)
वरील नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकाकडुन पुणे शहरचे एकुण ०३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन त्याचेकडुन किं रु १,४५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलिस आयुक्त गणेश इंगळे, गुन्हे शाखा १, पुणे शहर व दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – १, गुन्हे शाखा, चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक प्रविण काळुखे, श्रेणी. पोलिस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलिस हवालदार बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनिषा पुकाळे, पोलिस नाईक रविंद्र लोखंडे, पोलिस अंमलदार साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

येरवडा पोलिसांनी सराईत आरोपीकडून २ गुन्हे आणले उघडकीस अन्…

अल्पवयीन आरोपींचं वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार: अजित पवार

पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…

पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी केले लाखो रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत…

Live Video: लवळे-नांदे रोडवर आयटी अभियंता आणि कुटुंबावर जमावाने हल्ला केला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!