
घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीला तिच्या प्रियकरासोबत खोलीत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर त्याने पत्नीच्या प्रियकराचा जागीच गळा आवळून खून केला. हत्येनंतर मृतदेह गोणीत बांधून स्कूटरवर प्रयागराजच्या नवाबगंज भागात विल्हेवाटीसाठी नेला. तिथे मृतदेह टाकून तो मुंबईला पळून गेला. ही घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील करारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडा अडहरा गावात घडली आहे.
महेश यांनी 19 जून रोजी करारी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती की, त्यांचा मुलगा विजय (वय 19) हा 16 जून रोजी रात्री 8 वाजता शौचासाठी घराबाहेर गेला होता. तेव्हापासून तो घरी परतला नाही. या माहितीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून विजयचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाला सुरवात केल्यानंतर कळले की विजयचे शेजारी राहणाऱ्या रणजीत कुमार याच्या पत्नीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. तिलाही तीन मुलं असून तिचा नवरा मुंबईत खासगी नोकरीला आहे.
रणजीतच्या अनुपस्थितीत विजय रात्री त्याच्या घरी येत राहायचा. एका अज्ञात व्यक्तीने रणजीतला फोन करून हा प्रकार सांगितला. सत्य जाणून घेण्यासाठी रणजीत 16 जून रोजी कोणालाही काहीही न सांगता अचानक मुंबईहून घरी पोहोचला. त्याने घराचा दरवाजा उघडला असता आतील दृष्य पाहून त्याला धक्का बसला. त्यानंतर रणजीतने विजयचा गळा दाबून खून केला. मृतदेह गोणीत भरून प्रयागराजच्या नवाबगंज पोलिस स्टेशन परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि पळून गेला.
दरम्यान, पोलिसांनी रणजितच्या पत्नीची कसून चौकशी केली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला मुंबईहून परत बोलावून अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…
चिमुकलीने चुलतीला नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नको ते घडलं…
डॉक्टर पत्नीला दोन युवकांसोबत नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले…
नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…
प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…