धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…

मुंबई: विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची परिसरात राहणाऱ्या एकाने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे मानलेला भाऊ प्रियकर निघाला असून, त्यानेच महिलेची हत्या केली. विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

धनश्री रुपेश आंबडस्कर (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. धनश्री ही पती रुपेश आंबडस्कर (वय 37) तसेच नेत्रा आणि नव्या या दोन लहान मुलींसह विरार पश्चिमेच्या फुलपाडा येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहत होती. सोमवारी सकाळी तिचा पती रूपेश कामावर गेला होता, तसेच दोन मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान दुपारच्या सुमारास या प्रकरणातील संशयित आरोपी शेखर कदम हा धनश्रीच्या घरी आला होता. काही कारणास्तव त्या दोघामध्ये भांडण झाले आणि संशयित आरोपीने धनश्रीचा साडीने गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याने धनश्रीची तब्येत बिघडल्याचा बनाव रचून तिला जवळचा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला तेथे मृत घोषित केले.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसांना या बाबत संशय आला. परिणामी पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक गतिमान करत हा घटणेचा तपास सुरू केला. तपासाअंती या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर संशयित आरोपी शेखर याने धनश्रीची हत्या केल्याचे उघड झाले. विरार पोलिसांनी संशयित आरोपी कदम याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन, त्याला अटक केली आहे. मात्र या हत्येचे घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पती रुपेश आंबडस्कर याने दिलेल्या माहितीनुसार, धनश्री आणि रुपेश हे दाम्पत्य त्यांच्या 10 आणि 5 वर्षांच्या दोन मुली आणि मेहुणी यांच्यासह विरारच्या फुलपाडा येथील घरात राहत होते. सोमवारी दुपारी 12.17 च्या सुमारास गोरेगाव येथील कंपनीत कामावर असताना रूपेशला पत्नी धनश्रीचा फोन आला. यावेळी तिने त्याला तातडीने घरी येण्यास सांगितले. मात्र, फोन कट केला. सायंकाळी 5.24 च्या सुमारास रुपेशला त्याच्या शेजाऱ्यांचा फोन आला. पत्नीची प्रकृती बिघडली असून तिला रूग्णालयात घेऊन जात असल्याचं शेजारच्यांनी सांगितले. मात्र रुग्णालयात दाखल करताच तिचा रूग्णालयात मृत्यू झाला. शेखर कदम हा देखील विवाहित असून तो देखील फुलपाडा परिसरात पत्नी आणि एका मुलीसह राहत आहे. याप्रकरणी विरार पोलिस आरोपी शेखर कदम याला पहाटे अटक करण्यात आली आहे, अशी माहिती विरार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय पवार यांनी दिली.

चुलतभावासह दोन मित्रांनी केला विवाहित बहिणीवर अत्याचार…

सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…

प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…

क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!