
कोल्हापूर! लग्न ठरल्याने प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून; प्रियकराने सांगितले…
कोल्हापूर : प्रेयसीला कड्यावरून ढकलून खून केल्याप्रकरणी प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नाईकवाडी धबधब्याजवळ ही घटना घडली. तरन्नुम बशीर नाईक (वय २२) या युवतीचा यामध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात स्वतःहून हजर झालेल्या श्रीपाद दिनकर वडरने खुनाची कबुली दिली आहे. पोलिसांनी यामधील घटनाक्रम सांगितला आहे.
युवतीच्या मृत्यूमागील नेमका घटनाक्रम उलगडण्यासाठी पोलिसांकडून विविध पुरावे तपासले जात आहेत. तरन्नुमचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याने निर्माण झालेल्या वादातून तिचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रियकराला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तरन्नुमचा खून केल्यानंतर श्रीपादने बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरलं असल्याने दोघांनी मिळून आत्महत्येचा निर्णय घेतला होता का? याबाबत कोणताही आतापर्यंत पुरावा मिळाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
पोलिस उपधीक्षक विक्रम पाटील यांनी सांगितले की, ‘भुदरगड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पाटगाव परिसरामध्ये नाईकवाडी धबधबा आहे, या ठिकाणी एक युवती मिसिंग असल्याची एक तक्रार पीडितेच्या आईने दिली होती. त्या अनुषंगाने आम्ही संशयित आरोपीला घेऊन 9 तारखेला घटनास्थळी गेलो असता त्याने धबधबा परिसरामध्ये दरीमध्ये धक्का देऊन तिचा मृत्यू घडवून आणल्याची कबुली दिली. सह्याद्री ट्रेकर्सच्या माध्यमातून तरुणीची बॉडी रिकव्हर करण्यात आली. गुन्ह्याचा तपास भुदरगड पोलिसांमार्फत सुरू असून पुराव्याअंती चार्जशीट दाखल केले जाईल.
घटनास्थळी पीडित युवती आणि आरोपी धबधबा पॉईंट बघण्यासाठी गेले होते. तिथे त्यांच्यामध्ये नेमका कोण वाद झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु त्याने धक्का मारल्याची कबुली दिली आहे. त्या मुलीचं लग्न एप्रिल महिन्यामध्ये ठरवण्यात आलं होते. परंतु, त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. मात्र, त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. मुलीचं शिक्षण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुरू होते. त्या ठिकाणी देखील यांची भेट झाली आहे. परंतू घटनास्थळी असा कोणता ट्रिगर पॉईंट ठरला की ज्यामुळे आरोपीने हे कृत्य घडवून आणलं, याबद्दल आता सद्यस्थितीत माहिती देणं थोडं कठीण आहे. 15 तारखेपर्यंत आम्हाला कोर्टाने आरोपीची पोलीस कोठडी दिली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आरोपीकडून आणखी खुलासा होण्याची शक्यता आहे, असेही विक्रम पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूरमध्ये प्रेमाचा भयानक शेवट; तू माझी नाही तर कोणाचीच नाही…
कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..
कोल्हापूर! प्रियकराने केलेल्या माजी सरपंचबाईंच्या हत्येत आला नवा ट्विस्ट…
कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…
कोल्हापूर! नवऱ्याने मध्यरात्री आवळला पत्नीचा गळा; पैसे कोणाला देतेस…
नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…

