पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने राबविण्यात आला ‘आरोग्यवती भव’ उपक्रम!

पुणेः प्रत्येक कुटुंबाचा सर्वांत भक्कम आधार एक महिला असून, कुटुंबासाठी तिची जीवनशैली कायम व्यस्त असते. या व्यस्त जीवनशैलीत ती स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. त्या महिलेला स्वतःविषयी जाणीव करून देण्यासाठी ‘आरोग्यवती भव’ हा आगळा वेगळा उपक्रम पुणे शहर पोलिस आयुक्तालयात राबविण्यात आला आहे.

पुणे शहर पोलिस आयुक्तालयात पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली रुबी हॉल हॉस्पिटलच्या सहकार्याने शिवाजीनगर पोलिस वसाहत व स्वारगेट पोलिस वसाहतीमधील पोलिस कुटुंबातील महिलांसाठी १० ते ११ ऑक्टोबर रोजी वैद्यकीय कँम्प यशस्वीरित्या पार पडला. यावेळी ४०० पोलिस कुटुंबियांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. १७ ऑगस्ट रोजी वैद्यकीय तपासणीचे अहवाल त्यांना वाटप करून त्याबाबतचे विश्लेषण करण्यात आले.

सदर कार्यक्रमास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या पत्नी अनप्रिया कुमार, प्रिया कर्णिक, डॉ. स्वाती पोकळे, डॉ. सुरेखा चावरिया, रुपाली झेंडे, तेजश्री पवार, डॉ. तेजश्री रानडे, रुबी हॉल हॉस्पिटलचे ड. प्रसाद मुलीकर-डायरेक्टर मेडिकल सर्व्हिसेस, प्रभाकर श्रीवास्तव, जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्स, ऋषिकेश खांदवे, जनरल मॅनेरज मार्केटिंग, डॉ. रश्मी बामरे, स्रीरोग तज्ज्ञ, डॉ. देबाशिस देसाई, संसर्गजन्य रोग तज्ज्ञ तसेच त्यांची टीम व टेक्निशियन, शिवाजीनगर पोलिस हॉस्पिटलचे डॉ. राऊत, डॉ. देशपांडे, डॉ. क्षिरसागर व त्यांची टीम.

स्वारगेट पोलिस हॉस्पिटलचे ज. जगदाळे व त्यांची टीम, होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेचे कॅरोलीन व त्यांची टीम, मुस्कान या स्वयंसेवी संस्थेच्या शुभदा रणदिवे व त्यांची टीम, भरोस सेलचे वपोनि. अनिता मोरे, संगिता जाधव, कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनचे वपोनि. निलीमा पवार, मार्केटयार्ड पोलिस स्टेशनचे पो.नि. (गुन्हे) स्वप्नाली शिंदे व इतर पोलिस अधिकारी आणि अंमलदार हजर होते.

Video: एएम इन्फोवेब फाउंडेशनच्या वतीने पुणे पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!