प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…
नवी दिल्ली : प्रेम विवाह केलेल्या मुलीकडे आई-वडिल आणि भाऊ गेल्यानंतर त्यांनी युवतीचा खून केला. मृतदेह गाडीत ठेवून आपल्या गावी नेला आणि मुलीवर जंगलात अंत्यसंस्कार केले. पण, पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गावात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की, तुझ्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या घरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंजली (वय २२) पती संदीपसोबत (रा. Roff Aalyas , सेक्टर 102, गुरुग्राम येथील फ्लॅट क्रमांक 20)1 मध्ये राहत होती. अंजली बीएस्सीची विद्यार्थिनी होती. गुरुवारी संदीप आपल्या बहिणीच्या घरी एका सणानिमित्त मिठाई देण्यासाठी गेला होता. यावेळी भाऊ कुणाल, वडील कुलदीप आणि आई रिंकी अंजलीच्या फ्लॅटवर पोहोचले. आईने अंजलीचा हात धरला, भावाने पाय धरले तर वडील कुलदीपने अंजलीचा गळा दाबला. तिघांनी मिळूनखून केल्यानंतर अंजलीचा मृतदेह त्यांच्या कारमध्ये ठेवला आणि गुरूग्रामहून त्यांच्या झज्जर येथील सुरती या गावी निघून गेले.
दरम्यान, संदीपला याबाबतची माहिती समजल्यानंतर धक्का बसला. पोलिसांना अंजलीचा मृत्यू आणि तिच्या अंत्यसंस्काराची माहिती दिली. पोलिसांनी अंजलीचे वडील, आई आणि भावाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिघांनीही अंजलीच्या हत्येची कबुली दिली आहे.
पोलिस अधिकारी वरुण दहिया यांनी सांगितले की, ‘ऑनर किलिंगमधून हा प्रकार घडला आहे. अंजली आणि संदीप हे एकाच गावचे (सुरती) रहिवासी आहेत. अंजली जाट कुटुंबातील असून संदीप ब्राह्मण कुटुंबातील आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. 19 डिसेंबर 2022 रोजी दोघांनी मंदिरात लग्न केले होते. आपल्या जीवाला धोका आहे, हे त्यांना माहित असल्यामुळे दोघेही गाव सोडून गुरुग्राममधील सेक्टर 102 मध्ये राहात होते. अंजलीचे कुटुंबीय या लग्नामुळे खूश नव्हते. त्यामुळे आई-वडील आणि भावाने मिळून अंजलीला मारण्याचा कट रचला. अंजलीच्या भावानेही प्रेमविवाह केला होता. यानंतर त्याने अंजली आणि संदीपशी संपर्क साधला. त्यांना विश्वासात घेऊन तोही त्या दोघांसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहू लागला. 17 ऑगस्ट रोजी संदीप रोहतक येथील बहिणीच्या घरी मिठाई देण्यासाठी निघाला असता कुणालने त्याच्या पालकांना याची माहिती दिली. यानंतर आई-वडील मुलगा कुणालसह फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांनी मुलगी अंजलीची हत्या केली. पुढील तपास सुरू आहे.’
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…
प्रियकरासह त्याच्या मित्रांनी विद्यार्थिनीचे न्यूड फोटो केले व्हायरल…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…