प्रेम, कारागृह आणि प्रेमीयुगलाचा एकाच खोलीत धक्कादायक शेवट…

पाटना (बिहार): गोपालगंजमध्ये एका प्रेमी युगलाची हत्या करण्यात आली असून, दोघांचे मृतदेह एकाच खोलीत सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. भोरे क्षेत्रातल्या कल्याणपूर गावात ही घटना घडली. प्रेयसीचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता, तर प्रियकराचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कल्याणपूर गावातील मंटू सिंह आणि त्यांच्या शेजारी राहात असलेले पुष्पा कुमारी यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वी ती दोघे घर सोडून पळून गेले होते. मात्र कुटुंबीयांच्या दबावामुळे त्या दोघांनाही परत यावं लागलं होते. 2022मध्ये पुष्पाचे लग्न तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या युवकासोबत लावून दिले होते. लग्नानंतर माहेरी आलेली पुष्पा पुन्हा एकदा आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. दोघेही लखनौ येथे राहात होते. दरम्यान, मंटूचा विवाह अन्य कोणा मुलीशी लावण्यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांनी तयारी सुरू केली. पुष्पावर अत्याचार होऊ लागल्यानंतर पुष्पाने गोपालगंज महिला ठाण्यात हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी मंटूला महिला ठाण्याच्या पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले होते. काही दिवसांपूर्वीच मंटू तुरुंगातून सुटून आला आणि थेट आपल्या घरी गेला, जिथे पुष्पा राहत होती. गुरुवारी (ता. 21) दुपारपर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नाही, त्यामुळे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना शंका आली. डोकावून पाहिले असता त्यांना दोघांचे मृतदेह दिसले.

मंटूचे कुटुंबीय पुष्पाच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप करत आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पुढील तपास करत आहेत.

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…

प्रेमी युगलाने एकमेकांना घट्ट बांधून विहिरीत उडी घेतली अन्…

धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!