
ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…
सिंधुदुर्ग : सांवतवाडी तालुक्यात एका महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सायली धुरी असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालक्यातील तळवडे गावात ही घटना घडली आहे. सायली तळवडे गावच्या जनता विद्यालयात 12वी मध्ये शिकत होती. महाविद्यालयातून घरी जात असताना वडाचे झाड उन्मळून तिच्या अंगावर पडले. या घटनेत सायलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावेळी विद्युत वाहिन्याही ताराही तुटून रस्त्यावर पडल्याचे नंतर निदर्शनास आले आहे. त्यामुळे सायलीचा मृत्यू नेमके झाड पडून झाला की, विजेच्या वाहिन्यांना स्पर्श होऊन झाला, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सायलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. सायलीच्या मृत्युमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगरी भागात देखील मोठ्या प्रमाणात पाणी कोसळल्याने काही जमिनींचा भाग हा जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येते. महाड तालुक्यातल्या दासगाव मोहल्ला परिसरात एक घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दरडीसोबत आलेला भला मोठा दगड घराच्या मागच्या बाजुने आल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घरातील अनेक भिंतींना तडे देखील गेले आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घराच मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तू माझी झाली नाही तर, मी तूला कोणाचीच होऊ देणार नाही…
पुणे जिल्हा हादरला! अनैतिक संबंध, गर्भपाताचा प्रयत्न अन् चिमुकल्यांना जिंवत नदीत फेकलं…
मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू…
Video: पुणे शहरातील युवतीचा रील्ससाठी जीवघेणा स्टंट…
एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

