हनिमूनच्या रात्रीच पत्नीने केली नवरदेवाला बेदम मारहाण…

मंगळूर (कर्नाटक) : विवाह सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर हनिमूनच्या रात्री नवरदेवाला पत्नीने बेदम मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

22 नोव्हेंबर रोजी माधोपूर येथे राहणाऱ्या युवकाचे लग्न मंगळूरच्या खेमपूर थिथोला कोतवाली येथे राहणाऱ्या युवतीसोबत झाले होते. यानंतर हनिमूनच्या रात्री दोघांमध्ये वाद झाला. पत्नीने पतीला बेदम मारहाण केली. नवरदेवाचा ओरडण्याचा आवाज होताच कुटुंबीय खोलीत पोहोचले. यानंतर हे प्रकरण शांत झालं. हे प्रकरण मुलीच्या माहेरी आणि सासरच्या मंडळींपर्यंत पोहोचलं, त्यानंतर दोन्ही पक्ष समोरासमोर आले. सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. घरच्या घरी हे प्रकरण न मिटल्यामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हनिमूनच्या रात्री दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर आता पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला आहे. पत्नी मानसिक आजारी असल्याचे पतीचे म्हणणे आहे. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली. यानंतर पत्नीने पतीला मारहाण केली. पत्नीच्या मानसिक आजाराची बाब सासरच्यांनी लपवून ठेवल्याचे पीडित युवकाचे म्हणणे आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, हनिमूनच्या रात्री नवरीने नवरदेवाला मारहाण केल्याची माहिती परिसरात समजली. यानंतर चर्चांणा उधान आले आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांतता प्रस्थापित करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला आहे. कोणत्याही पक्षाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक अमरजीत सिंह यांनी सांगितले.

हनिमूनच्या रात्री नवऱ्याला खावू घातली गोळी अन्…

हनिमूनच्या रात्री नवरदेव मोठमोठ्याने ओरडत आला खोलीबाहेर…

हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!