लग्न मंडपात प्रियकराचे कृत्य नवरदेव पाहातच राहिला अन् अखेर…

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाह सोहळ्यादरम्यान नवरीच्या प्रियकराने स्टेजवर प्रवेश करत नवरीला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या घटनेमुळे नवरदेवासह उपस्थितांना धक्का बसला. सिंदूर लावणाऱ्या युवकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना भदोही येथे घडली आहे. काही वेळातच शांतपणे नवरदेवाने लग्नास नकार दिला.

ग्रामस्थांनी लग्नाच्या वरातीतील लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, वरात नवरीशिवायच परतली. सिंदूर लावलेल्या युवकाला वधूसोबत लग्न करायचे होते. आमच्या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे तो सांगत होता. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

जौनपूर जिल्ह्यातील मुंगरा बादशाहपूर येथून भदोहीच्या कोईरौना पोलिस स्टेशन हद्दीतील गावात वरात आली होती. वरातीच्या स्वागतानंतर लग्नात आलेल्या पाहुण्यांना जेवण देण्यात आले. रात्री उशिरा लग्नसोहळ्याची तयारी सुरू झाली. वधूही मंडपात आली. लग्नाचे विधी चालू असतानाच एक युवक लग्न मंडपात आला आणि वधूला सिंदूर लावला. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण हादरले. नवरीच्या बाजूच्या लोकांनी युवकाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. वधू पक्षाच्या लोकांनी वराला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी कुटुंबीयांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला पण काही निष्पन्न झाले नाही. पहाटेपर्यंत गोंधळ सुरू होता आणि बुधवारी सकाळी लग्नाची वरात वधूविना रिकाम्या हाताने परतली.

सिंदूर लावणाऱ्या युवक हा नातेवाईकच निघाला आहे. दोघांचे प्रेमसंबंधाला कुटुंबियांची मान्यता नव्हती. मुलीचे इतरत्र लग्न होऊ नये यासाठीही त्याने प्रयत्न केले. त्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्याने मंडपातच सर्वांसमोर आपल्या मागण्या मांडण्याचे धाडसी पाऊल उचलण्याचे ठरवले आणि आपला कट पार पाडला.

नवरदेवाने उपस्थितांना दाखवले नवरीचे नको ते फोटो अन् व्हिडिओ…

नवरदेवाची मैत्रीण ऐनवेळी घरी पोहचल्याचे नवरीला समजले अन्…

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..

नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!