पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…

नवी दिल्ली : भारतातून राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतली आहे. वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केलं. पाकिस्तानात गेल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. भारतात परतल्यानंतर अंजू सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे.

पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय सचिन मीणा यांची अनोखी प्रेमकथा गाजत होती, त्याचवेळी अंजू या भारतीय युवतीची पाकिस्तानच्या युवकासोबत प्रेमकथाही गाजली. पाकिस्तानात राहिल्यानंतर अंजू भारतात परतली आहे. तिचा पाकिस्तानी पती तिला वाघा बॉर्डरपर्यंत सोडायला आला होता. अंजू थोड्या दिवसांसाठीच भारतात आली आहे. आपल्या मुलांना भेटण्यासाठी ती आली आहे. अंजू सध्या बीएसएफच्या कॅंपमध्ये असून विमानाने ती अमृतसरहून दिल्लीला जाणार आहे.

अंजू तिचा पती अरविंद आणि दोन मुलांसोबत राजस्थानच्या अलवर येथे रहात होती. सोशल मिडीयावर तिची ओळख पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथे रहाणाऱ्या नसरुल्लाह याच्याशी झाली. 21 जुलै 2023 रोजी अंजू घरातून जयपूरला आपल्या मित्रांना भेटायला जात सांगून गेली होती. त्यानंतर टुरिस्ट व्हीसावर ती पाकिस्तानात गेली. पाकिस्तानात तिने नसरुल्लाह सोबत लग्न केले आणि त्याच्या सोबत रहात आहे. अंजूने पाकिस्तानात आपला धर्मही बदलला आणि ती अंजूची फातिमा बनली.

अंजू थॉमस मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील टेकनपूर गावातील रहिवासी आहे. 2007 मध्ये तिचे लग्न बलिया येथील अरविंद कुमारशी झाले. दोघांचे हे लव्ह मॅरेज होते. लग्नानंतर ती अलवरच्या भिवाडी येथे राहू लागली. दोघेही येथे खाजगी नोकरी करीत होते. अंजूच्या पाकिस्तान जाण्याने तिचा पती अरविंद नाराज आहे. अरविंद याने अंजूला केव्हाच मुलांशी भेटू दिले जाणार नाही, असे म्हटले आहे.

अंजू भारतात का आली?
अंजू कायमची भारतात आली आहे की पुन्हा पाकिस्तानात परतणार हे अदयाप स्पष्ट नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत नसरुल्लाहने एका मुलाखतीत अंजू आपल्या मुलांसाठी भारतात जाणार असल्याचे म्हटले होते. मुलांसह अंजू पाकिस्तान आली तर आम्हाला आनंद आहे. पण तिला भारतातच रााहावं वाटलं तर ती राहू शकते तिची इच्छा आहे असेही नसरुल्लाहने स्पष्ट केले होते.

प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…

अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…

Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…

अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…

Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!