विवाहित महिलेने घेतला जगाचा निरोप; गुन्हा दाखल…

जळगाव: मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे घडली.

वर्षा गणेश सूर्यवंशी (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

वर्षा हिचे ३ वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला मूलबाळ होत नसल्याने घरात वाद होत होते. यात १८ तारखेलाही पती-पत्नी आणि सासू यांच्यात वाद झाला. या जाचाला कंटाळून वर्षाने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी सुनील मांगू पाटील (वय ४७) यांच्या फिर्यादीवरून पती गणेश उर्फ परेश संजय सूर्यवंशी (वय २९), सासरे संजय आत्माराम सूर्यवंशी (वय ५३), सासूरेखाबाई संजय सूर्यवंशी (वय ४८, तिघे रा. कुसुंबा), नणंद माधुरी पाटील (वय ३२, रा. करजगाव ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वर्षा हिच्यावर १९ रोजी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन कुसुंबा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पती, सासरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पतीचा मृत्यूनंतर मुलाला विष पाजून घेतला जगाचा निरोप…

धक्कादायक! पती-पत्नीने एकाच खोलीतून घेतला जगाचा निरोप…

एकाच कुटुंबातील सात जणांनी घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!