हृदयद्रावक! बोअरवेलमधून चिमुकलीला १७ तासांनी बाहेर काढले पण…

अमरेली (गुजरात) : एक दीड वर्षांची चिमुकली 50 फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये पडली होती. चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी सलग 17 तास प्रयत्न सुरू होते. पण, बाहेर काढेपर्यंत उशीर झाला होता. चिमुकलीच्या मृत्युमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गुजरातमधील अमरेली येथे ही घटना घडली आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि संपूर्ण गाव हळहळले. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांनंतरही आरोहीला वाचवण्यात अपयश आले, ती फक्त दीड वर्षांची होती आणि इतर मुलांसोबत खेळत होती.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

सुरगपुरा गावात आरोही बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ माहिती प्रशासलाना दिली. एनडीआरएफ आणि अमरेली अग्निशमन विभागाने 17 तास आरोहीला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…

हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!