बीएसएफमधील उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत पकडले रंगे हाथ; पोलिसांना घेऊन गाठले थेट हॉटेल आणि पुढे…

इंदूरः इंदूरमधील (मध्य प्रदेश) एका हॉटेलमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील (बीएसएफ) उपनिरीक्षकाला त्याच्या पत्नीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडले. संतापलेल्या पत्नीने तातडीने जवळचे पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना सोबत घेऊन थेट हॉटेलच्या पती असलेल्या खोलीवर छापा घातला. त्यानंतर खोलीत झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या उपनिरीक्षकाचं नाव आकाश निरंजन असून, त्याची पत्नी रुची पटेल हिने पती पाच दिवसांपासून दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये राहत असल्याचा आरोप केला आहे. या व्हीडिओमध्ये पत्नी काही पोलिसांबरोबर हॉटेलमधील खोली क्रमांक १०५ च्या बाहेर पोचलेली दिसते. पतीने दरवाजा उघडल्यानंतर पोलिस खोलीची पाहणी करतात. यावेळी दुसरी महिला बाथरूममध्ये लपलेली दिसते. पोलिसांनी बाथरूमचे दार ठोठावून तिला बाहेर येण्यास सांगितले. या संपूर्ण प्रकारादरम्यान संबंधित BSF उपनिरीक्षक पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. पोलिसांनी खोलीतील सामानाचीही पाहणी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

महिला बाथरूममधून बाहेर आल्यानंतर पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादी होते. पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहून पत्नी संतापते. पतीला मारण्यासाठी ती पुढे जाते. मात्र, उपस्थित पोलिस कर्मचारी मध्ये पडून तिला रोखतात.

व्हिडीओच्या शेवटी एका पोलिस कर्मचाऱ्याचा आवाज ऐकू येतो. पत्नीला शांत करताना तो ‘तुम्ही त्यांना असे मारू शकत नाही. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल’, असे सांगताना ऐकू येते.

भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत केवळ विवाहबाह्य संबंध ठेवणे हा फौजदारी गुन्हा नाही. मात्र, अशा प्रकरणात मारहाण, धमकी, छळ किंवा इतर कोणताही गुन्हा घडल्यास कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते. विवाहबाह्य संबंधांचा कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांमध्ये, विशेषतः घटस्फोटाच्या बाबतीत, विचार केला जाऊ शकतो.

नवऱ्याला दीड लाख पगार अन् प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले…

प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…

मामी करायची भाच्यावर लैंगिक अत्याचार; रंगेहात पकडले अन्…

कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!