महिला पोलिसाचा प्रसूतीदरम्यान आकस्मिक मृत्यू, बाळही दगावलं…

रत्नागिरी: रत्नागिरी पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (ता. 25) घडली आहे. या दुर्दैवी घटनेत त्यांचे नवजात बाळही दगावले आहे. सांची सुदेश सावंत (वय ३६) असे मृत्यू झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे पोलिस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांची सावंत या नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या. गुरुवारी रात्री त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना प्रसूतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्या ठिकाणी त्यांना अचानकपणे आकडी आल्याने त्या बेशुद्ध पडल्या. अधिक उपचारांसाठी शहरातीलच दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचारांदरम्यान शुक्रवारी दुपारी 3.18 वाजताच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

सांची सावंत यांचे पतीही पोलिस विभागातील श्वान पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला आधीच दोन मुली असून, सांची या तिसऱ्यांदा गरोदर असताना हा दुर्दैवी प्रसंग घडला. त्यांच्या मृत्यूमुळे सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

माजी पोलिस अधिकाऱ्याचा बॅडमिंटन खेळताना कोर्टवरच मृत्यू…

साईबाबाच्या दर्शनासाठी पायी जात असलेल्या पोलिसकाकाचा वाटेतच मृत्यू…

हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

पिंपरीमधील पोलिसकाकाचा बंदोबस्तावरून घरी जाताना अपघाती मृत्यू…

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!