
भावाच्या सुनेची कुऱ्हाडीने वार करुन हत्या तर वहिनीचा कापला कान…
गोंदिया : एकाने किरकोळ वादातून आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आणि वहिनीचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवरी या गावात प्रीतम ठाकरे याने आपल्या भावाच्या सुनेची धारदार कुऱ्हाडीने हत्या केली आहे. ठाकरे परिवार हे गेल्या अनेक वर्षापासून राहत असून प्रीतम ठाकरे यांचे त्याच्या भावाच्या मुलांसोबत आणि सुनेसोबत छोट्या मोठ्या कारणांवरून नेहमी वादविवाद व्हायचे. या वादविवादाचा राग मनात ठेवून प्रीतम ठाकरे यांनी त्याच्या भावाची सून शेतात येत असताना तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आपल्या कुऱ्हाडीने दहा ते पंधरा वार करून हत्या केली. त्याच कुऱ्हाडीने आपल्या वहिनीवर वार करीत असताना तिचा कान कापल्या गेला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वहिनीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय केटीएस येथे दाखल करण्यात आले आहे. आरोपीला दवणीवाडा पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास दवणीवाडा पोलीस स्टेशन करीत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, गुन्हा दाखल…
छऱ्याच्या बंदूकीने गोळी घालून विवाहित महिलेची केली हत्या…
अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…
जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…
सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…