हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

गडचिरोली : विवाहानंतर फिरायला गेलेल्या नवरदेवाचा लग्नाच्या चौथ्याच दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27, रा. चंद्रपूर) असे मृत्युमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव आहे.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

नवनीत हा लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत फिरायला गेला होता. तेव्हाच तो पाण्यात बुडू लागला. तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी बादल हेमके धावले. यावेळी या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते. ते भामरागड येथे राहत होते. हेमके आणि धात्रक यांचे कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे. यामुळे घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! आईच्या डोळ्यात देखत मुलगी आणि बहिणीचा मृत्यू…

हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…

हृदयद्रावक! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केला आक्रोश…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!