हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत ७ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दिल्लीत रात्री साडे अकराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या कार्यालयात फोन आला. विवेक विहार परिसरात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर घटनास्थळी ९ गाड्या पाठवण्यात आल्या. त्यावेळी इमारतीतूनव १२ नवजात बाळांना बाहेर काढण्यात आले. पण, आग इतकी भीषण होती की या आगीत ३ मजली इमारत जळून खाक झाली.

अग्निशमन दल विभागाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, विवेक विहारमध्ये आयआयटी ब्लॉक बीजवळ एक बेबी केअर सेंटर आहे. त्याठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तिथून बाहेर काढलेल्या बाळांना दुसऱ्या एका रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

भाविकांच्या बसला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….

हृदयद्रावक! आईला मिठी मारलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!