हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

पुणे : पुणे जिल्ह्यातील कासुर्डी (ता. दौंड) येथे माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता. ११) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासुर्डी गावातील सोनजाई मंदिराजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुहानी तुषार तम्मनर (वय २२, रा. विश्रांतवाडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. सुहानी तिच्या माहेरी कासुर्डी येथे आली होती. वडील सुदाम दगडू ठोंबरे यांच्या शेतात कामे सुरू असल्याने कुटुंबातील सर्व शेतात होते. सुहानी हीसुद्धा तिच्या कुटुंबासमवेत शेतात गेली होती. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक जोरदार वाऱ्यासह विजा चमकण्यास सुरुवात झाली. काही कळण्याच्या आत एक जोरदार आवाज होऊन वीज सुहानी हिच्या अंगावर पडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने उरुळी कांचन येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचे निधन झाले.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

सुहानी एक तासापूर्वीच आली होती माहेरी आली होती. सुहानी हिचे सासर विश्रांतवाडी पुणे येथील होते. तिच्या मावशीच्या मुलीचे लग्न असल्याने माहेरी आली होती. गुरांना घास आणण्यासाठी भावा सोबत शेतात गेली असताना अचानक वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! विजेचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू…

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!