
अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीचा मोठा गौप्यस्फोट…
मुंबई : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी वडील विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, अनिल परबी उपस्थित होते.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह सुरू असताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आता त्यांचे वडील विनोद घोसाळकर, पत्नी तेजस्वी यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक आरोप केले आहेत. त्या दिवाशी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येसोबत आणखी एक हत्या होणार होती, असा धक्कादायक खुलासा तेजस्वी घोसाळकर यांनी केला आहे.
अभिषेकच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. अमरेंद्र मिश्रा व इतर काही व्यक्ती तिथे होती. पण त्याबद्दल तपास झालेला नाही. आम्ही जी कलमे लावण्याची मागणी केली होती, ती मान्य केली नाही. मलाही त्यावेळी मॉरीसने मलाही बोलवले होते. पण मला वेळ झाल्याने अभिषेकने मला दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवले, असा खुलासा तेजस्वी घोसाळकरांनी केला आहे.
‘अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख तिथे फिरताना सीसीटीव्हीत दिसतायत. पोलिसांना आम्ही ती दिलेली आहेत. अभिषेकला गोळी घालणारा दिसत नाही. परंतु गृहमंत्री म्हणतात की तिसरा व्यक्ती तिथे नव्हता. तपास अपूर्ण असताना हे कसे काय म्हणतात. मॉरीस पोटमाळ्यावर जातो आणि डोक्यात गोळी झाडून घेतो. यामध्ये लाईट जाते. हा संशयाचा भाग आहे. तिथे तिसरी व्यक्ती होती, असे आमचे मत आहे, असा दावाही घोसाळकरांनी केला.
‘8 फेब्रुवारी रोजी माझ्या मुलाची हत्या झाली आहे. त्या बद्दल मी बोलत आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होत नाही. 28 फेब्रवारी रोजी पोलिस यांना CCTV फुटेज दिले आहेत. या ठिकाणचे सर्व पुरावे सीसीटीव्ही दिले आहे. त्या ठिकाणी धर्मेंद्र मिश्रा आणिु मेहुल पारेख हे उपस्थित होते. मॉरीसला त्या ठिकाणी पिस्तुल दिले होते. या पिस्तुलीसाठी लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्यासाठी मिश्रासोबत होते. ज्या कार्यक्रमाला अभिषेक यांना बोलावले, त्या ठिकाणी मलाही बोलावले. सरकारला विनंती आहे, माझा मुलाचे छत्र राहिलेले नाही, या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई योग्य पद्धतीने व्हावी,’ अशी मागणी घोसाळकर यांनी केली आहे.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिस याने यूट्युबवरुन घेतले प्रशिक्षण…
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?
आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी…
गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

