
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली भारतीय जवानाला अटक…
चंदीगड (पंजाब): पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी भारतीय लष्कराच्या जवानाला पंजाब पोलिसांनी केली आहे. नाशिक आर्मी कँटान्मेंटमध्ये तैनात असताना पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे.
आरोपी जवान हा नाशिकमधील भारतीय लष्कराच्या कँटान्मेंटमध्ये तैनात होता. संदीप सिंह असे हेरगिरी करणाऱ्या जवानाचे नाव आहे. संदीप सिंह याने आयएसआयला नाशिक, जम्मू आणि पंजाबममधील अनेक लष्करी छावण्यांची माहिती दिली. याचा मोबदला म्हणून संदीप सिंह याला आयएसआयने 15 लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे.आरोपी संदीप सिंह कडून 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्याच्या फोनची तपासणी सुरू आहे. छावण्यांचे फोटो, शस्त्रांची माहिती तसेच लष्करी अधिकाऱ्यांच्या तैनाती संबंधित तपशील संदीप सिंह याने पाकिस्तानला पाठवला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, संदीप सिंह हा पंजाबचा पटियाला सरदुलगडचा रहिवाशी आहे. आरोपी संदीप सिंह काही दिवसांपूर्वी रजेवर पटियाला येथील घरी गेला होता. त्यावेळी घरींडा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला अटक केली. पंजाब पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक कँटान्मेंटमध्ये तैनात असलेल्या अमृतपाल सिंह नावाच्या जवानालाही आयएसआय साठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आरोपी संदीप सिंहने फिरोजपुर मधील एका निर्जन ठिकाणी याच अमृतपाल याला 2 लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे. अमृतपालचा आणखी एक सहकारी राजवीर सिंह नाशिक कँटान्मेंटमध्येमधून पळून गेला असून त्याच्या शोधासाठी नाशिक कँटान्मेंटमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (डीआरडीओ) संचालक डॉ. प्रदीप कुरूळकर यांना दहशतवाद विरोधी पथकाने जवळपास 2 वर्षांपूर्वी अटक केली होती. डॉ. प्रदीप कुरुळकर यांनी भारतीय क्षेपणास्त्रांचे गुपित पाकिस्तानी गुप्तचरांना दिले. त्यानंतर एसटीएसने कुरुलकरांना अटक केली आहे.
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…
Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…
लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…