पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन; धक्कादायक धमकी…

पुणेः मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे शहरातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलिस विभागात ही महिला पोलिस कार्यरत होती. अनघा ढवळ असे आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनघा ढवळे हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी अनघा सुनील ढवळे हिची कोथरुडच्या वाहतूक पोलिस विभागात नेमणूक होती. ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु, अशी धमकी दिली होती. दरम्यान, महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ढवळेचे निलंबन करण्यात आले आहे.

‘मी पुण्याची लोकल आहे, माझी गुंडांबरोबर ओळख आहे. आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो. आम्ही ब्लॅक मनीचे लीगलमध्ये रुपांतर करतो. आमचे 9 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तुझ्या नवऱ्याला 40 ते 50 लाख रुपये मिळतील, असेही ढवळे हिने पीडित महिलेला सांगितले होते. दरम्यान, पीडित महिलेने कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात तक्रार दाखल केली. यानंतर तिचे निलंबन करण्यात आले आहे.

पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…

पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…

पुणे सीआयडीचा अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे याला अटक…

Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…

Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!