
गुंड गजा मारणे याला ‘मटण पार्टी’ नंतर दुसरा ‘जोर का झटका’…
पुणेः कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात सांगली कारागृहात घेऊन जाताना हायवेवरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात गजा मारणे याला मोठा धक्का बसला आहे. गजा मारणे याला न्यायालयाने दणका दिल्याची माहिती समोर आली आहे.
‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…
गुंड गजा मारणे याला न्यायालयाचा दणका दिला आहे. गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. कोथरूडमध्ये एका युवकाला मारहाण केल्या प्रकरणी गजा मारणेवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली होती. जामीन अर्ज फेटाळत या प्रकरणात गजा मारणे याच्यासह दहा साथीदारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास न्यायालयाने गुन्हे शाखेला तीस दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण न्यायालयाने गजा मारणे याचा हा अर्ज फेटाळला असून, गजा मारणे याचा मुक्काम पुन्हा जेलमध्येच असणार आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर देवेंद्र जोग या युवकाला 19 फेब्रुवारी रोजी मारहाण झाली होती. जोग याला मारहाण झाल्यावर मंत्री मोहोळ यांनी पोलिसांना चांगलंच खडसावलं आणि कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर या मारहाण प्रकरणात 3 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये गजा मारणे याला देखील अटक करण्यात आली होती.
गजा मारणे याच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश दिला अमितेश कुमार यांनी आहे. मात्र, या पोलिसांचे निलंबन कायमस्वरुपी करावे, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.
गुंड गजा मारणे मटण पार्टी प्रकरणी मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
कुख्यात गुंड गजा मारणेची ‘मटण पार्टी’ पडली महागात; पोलिस निलंबीत…
कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…
गज्या मारणे टोळीकडून मंत्री मोहोळ यांच्या कर्मचार्याला बेदम मारहाण…
पुण्यातील गुंड गजा मारणे याला रिल्स बनवणं पडलं महागात…
रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
पुणे शहरातील वारजे माळवाडीतील गुंडाची आता खैर नाही…

