
प्रेयसीला म्हणाला; पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे अन्…
जयपूर (राजस्थान): एका युवकाने प्रेयसीच्या घरी जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भरत मिश्रा असे मृत युवकाचे नाव आहे. तो विवाहित होता. त्याने फेसबुकवर पोस्ट केली. त्यात त्याने आत्महत्येला पत्नी, प्रेयसी जबाबदार आहे, असे सांगितले आहे. त्याने फेसबुकवर सुसाईड नोट पोस्ट केली. पत्नी कौशल्या आणि प्रेयसीने मला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
भरत मिश्रा याने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पत्नीने माझी सर्व ठिकाणी बदनामी केली. मित्रांसोबत माझा वाद झाला. मला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. यामुळे सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. माझी पत्नी प्रेयसीच्या घरी गेली. ती प्रेयसीला वाईट बोलली. पत्नीचे ऐकून प्रेयसीदेखील मला त्रास देऊ लागली. आमच्यातला वाद वाढत गेला.’
प्रेयसीसाठी नोटमध्ये म्हटले आहे की, ‘तुझ्या फोनमध्ये माझा फोटो आहे. तो फ्रेम करुन माझ्या पार्थिवावर ठेव. मृतदेहाला अग्नी देण्याआधी पत्नी म्हणून सर्व विधी पूर्ण कर. तुझ्या पोटात असलेल्या माझ्या बाळाला जन्म दे.’
दरम्यान, भरतने आत्महत्या केली त्यावेळी त्याची प्रेयसी तिथेच होती. पण, तिने याची माहिती पोलिसांना दिली नाही. पोलिसांना उशिरा घटनास्थळी मृतदेह आढळला. त्याच्या शेजारी रिव्हॉल्वर आणि मोबाईल होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…
परदेशी प्रेम! भारतीय वकीलाचे पाकिस्तानी महिलेसोबत ऑनलाईन लग्न…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…