मामाच्या मुलीसोबत सहा महिन्यांपूर्वी केलं लग्न अन् चारित्र्याचा संशय…

रायगड : एकाने सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत विवाह केला. पण, विवाहानंतर चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून मृतदेह जंगल परिसरात टाकून दिल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. सतीश चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने पत्नी निकिता राठोड (वय अंदाजे २२) हिची निर्घृण हत्या केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीशचा विवाह अवघ्या सहा महिन्यांपूर्वी त्याच्या सख्ख्या मामाची मुलगी निकिता हिच्याशी झाला होता. विवाहानंतर हे जोडपे कर्नाटकातील गुरबर्गा येथून रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात आले होते. येथे चिरेखाणीवर मजुरीचे काम करत होते. लग्नानंतर काही दिवसांतच सतीशने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. यावरून वारंवार वाद होत होते. तसेच पैसे आणण्याचा तगादा सतीश लावत होता. पैशांवरून आणि संशयातून तो तिला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याची माहिती निकिताच्या नातेवाईकांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात सतीशने निकितावर हल्ला केला. तिचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह जवळील जंगल भागात नेऊन टाकल्याचे समोर आले.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, निकिता बेपत्ता असल्याची तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. चौकशीदरम्यान सतीशची विधाने विसंगत आढळल्याने पोलिसांनी त्याच्यावर संशय घेत सखोल चौकशी केली. अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार जंगल परिसरातून निकिताचा मृतदेह हस्तगत करण्यात आला आहे.

म्हसळा पोलिसांनी आरोपी सतीश चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अवघ्या सहा महिन्यांत संसाराचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…

पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…

नगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच दिवस जंगलात लैंगिक अत्याचार…

पुणे! महिलेने मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली अन् तिथेच फसली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!