पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या…

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये आज (सोमवार) सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी ट्यूशनमध्ये मुलाची (वय १६) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका खासगी ट्यूशनमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! युवकावर अत्याचार करणाऱ्या गौरीचा आणखी एक प्रताप समोर…

पुणे: एका महिलेने गुंगीचं औषध देत युवकाचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कोथरूड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणातील आरोपी महिला गौरी वांजळे हिचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. तिच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गौरी वांजळे हिने पती-पत्नीच्या कौटुंबीक वादातील प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडे तब्बल […]

अधिक वाचा...

‘वर्षा’ बंगल्यावर नेऊन विश्वास संपादन केला अन् घातला तीन कोटींना गंडा; शिवाय…

मुंबई : राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याची बतावणी करून एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीन कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तक्रारदाराचा विश्वास जिंकण्यासाठी पिवळा दिवा लावलेल्या कारचा वापर केला आणि त्याला थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या बाहेरपर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. व्यापारी शैलेश जैन यांनी […]

अधिक वाचा...

गौरी पालवे प्रकरण! अनंत गर्जे याच्या जुन्या प्रेयसीने जबाबात सांगितले…

मुंबईः भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी मुबंईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे आणि गौरीचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. गौरी यांना घराच्या शिफ्टींगच्या वेळी काही पेपर सापडले होते. त्यामध्ये एका महिलेचा उल्लेख होता. ही महिला अनंत गर्जेची जुनी प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. […]

अधिक वाचा...

नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपया नर्सरीजवळील पेट्रोलपंपासमोर गुरुवारी (ता. २७) दुपारी आलेल्या विचित्र अपघातात कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. स्वाती संतोष बेल्हेकर (वय ४५, रा. त्र्यंबकेश्वर) असे मृत महिलेचे नाव होते. स्वाती बेल्हेकर या गुरुवारी दुपारी दुचाकीवरून (एमएच १५, केडी केडी ९३७२) त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे निघाल्या होत्या. पपया नर्सरी परिसरात दुचाकी घसरल्याने त्या रस्त्यावर पडल्या. […]

अधिक वाचा...

पुणे! युवतीने 9व्या मजल्यावरून घेतली उडी; हृदयद्रावक चिठ्ठी…

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात गुरुवारी (ता. २७) सायंकाळी उशिरा एका युवतीने 9व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित युवतीची ओळख पटवली असून तिने आत्महत्या करण्याआधी लिहिलेली सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. मानसी (वय १९) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. सुसाइड नोटमध्ये आत्महत्येचं कारणही सांगितले आहे. “मी घरातल्या लोकांच्या […]

अधिक वाचा...

गौरी पालवे यांच्या वडिलांच्या आरोपामुळे पंकजा मुंडेंच्या पीएच्या वाढल्या अडचणी…

बीड : राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्यावर गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मुलीची हत्या झाली, त्यानंतर ती आत्महत्या दाखवण्यात आल्याचा आरोप गौरी पालवे यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणात जे काही करायचं ते करा, पण आम्हाला न्याय द्या अशी मागणी गौरी यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पंकजा मुंडे […]

अधिक वाचा...

पुणे! मोमोजचा व्यवसायातून घेतली थार कार अन् सहा मित्रांची ट्रिप ठरली शेवटची…

पुणे: हवेली तालुक्यातील कोंडवे धावडे गावातील सहा मित्र आपल्या नवीन कोऱ्या थार गाडीतून कोकणात फिरायला निघाले होते, पण मंगळवारी त्यांची ही कार घाटातील ५०० फूट खोल दरीत कोसळली आणि हा अपघात जीवघेणा ठरला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतांमध्ये साहिल गोठे (वय २४) हा व्यवसायिक होता. अत्यंत मेहनती आणि त्याने जिद्दीनं मोमोचा व्यवसाय […]

अधिक वाचा...

पुणे शहरात संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप राहणार बंद, कारण…

पुणे: पुणे शहरातील पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर गेल्या काही दिवसातून हल्ले होत असल्याचे प्रकार घडत आहेत. याच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी संध्याकाळी 7 नंतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे आता पुण्यात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील भैरोबानाला, पुलगेट आणि येरवडा येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला […]

अधिक वाचा...

पुणे शहरात चिमुकल्याला सावत्र आई-वडिलांकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात राहात असलेल्या 11 वर्षांच्या मुलाला सावत्र आई आणि वडिलांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित सोसायटीमधील सजग नागरिक आनंद शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावत्र आई आणि वडिलांविरोधात भारतीय अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा 2015 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!