मुंबई! चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 6 जणांचा जागीच मृत्यू…

मुंबईः मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात काल, रविवार (5 जुलै 2026) रोजी रात्री साडे आठच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक महिला अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले. शताब्दी रुग्णालयात दाखल एक महिला, 3 लहान मुली आणि एक लहान मुलगा अशा पाचही जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात एक लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि एक तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा; पाहा कोणकोणते रस्ते बंद…

मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…

मुंबईत कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू; अखेर सत्य आलं समोर…

माजी IPS अधिकारी मृत्यू प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!