पोलिसकाका Video News: २६ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…
‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पुणे शहराला पावसाने झोडपले; डेक्कन भागात पावसाचे तीन बळी
पुणेः पुणे शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. डेक्कन भागात असलेल्या भिडे पुलाजवळ अंडा भुर्जीचा स्टॉल सुरक्षित ठिकाणी नेत असताना विजेचा धक्का लागून तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, ठाणे येथील शाळांनाही आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
कोंढवा परिसरात रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास अटक
पुणेः पुणे शहरातील कोंढवा परिसरात रिक्षा चोरणा-या सराईत चोरट्यास कोंढवा तपास पथकाडून अटक करण्यात आली आहे. संदिप बबन गोसावी असे आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
परभणीत युवकाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
परभणी : परभणीच्या जिंतुर शहरातील एका युवकाला ताप येत असल्यामुळे खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते. पण, डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. राजरत्न कैलास वाकळे (वय 26) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
सायबर चोरट्यांची फसवणुकीची नवी पद्धत समोर
पुणेः सायबर चोरट्यांची चोरीची नवी पद्धत समोर आली आहे. संबंधित व्यक्ती फोनवर अश्लील फोटो किंवा व्हिडिओ बघत असल्याची बतावणी करून त्या व्यक्तीला अटकेची धमकी दिली जाते. यानंतर त्यांच्याकडून सर्व वैयक्तिक माहिती घेतली जाते. बँक अकाउंटशी संबंधित माहिती मिळवून अकाउंट खाली केले जात आहे.
दिल्लीत बहिणीच्या लग्नासाठी मालकाला लाखो रुपयांना लुटले
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांनी मालकाला लुटणाऱ्या एका युवकासह त्याच्या तीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने चोरलेल्या 14.5 लाख रुपयांपैकी पोलिसांनी त्याच्याकडून 11.56 लाख रुपये जप्त केले आहेत. बहिणीच्या लग्नासाठी आणि वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याचे तपासादरम्यान युवकाने सांगितले.
नागपुरात पुन्हा हिट अँड रन! महिलेने 3 दुचाकींना उडवलं
नागपूरः नागपुरातून हिट अँड रनची पुन्हा एक घटना घडली आहे. एका महिलेने सुसाट कार चालवत तीन ते चार जणांना उडवलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, आरोपी कारचालक महिलेला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
स्पायडरमॅनचा पोषाख घालून स्टंट करणारा ताब्यात
नवी दिल्लीः चालत्या गाडीच्या बोनेटवर उभं राहून स्पायडरमॅनचा पोषाख घालून स्टंट करणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली. शिवाय, २६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रील साठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.
राजस्थानमध्ये एका तोतया डीएसपीला अटक
जयपूर (राजस्थान): एक युवक मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी डीएसपी बनून फिरत होता. बाकरा पोलिसांनी तोतया डीएसपीला अटक केली आहे. आरोपी निशांत याच्या ताब्यातून नेम प्लेट, पोलिसांची वर्दी, दुचाकी ताब्यात घेतली आहे. मैत्रिणीसाठी संबंधित कृत्य केल्याचे त्याने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले.
सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील द्वारका नॉर्थ भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बंदुकीच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने पीडितेला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. पीडितेवर या पूर्वीही सामूहिक बलात्कार झाला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बिहारमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाने पत्नीचे केले ५७ तुकडे
पाटणा (बिहार) : एका सेवानिवृत्त शिक्षकाने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. दोघांच्या लग्नाला 57 वर्षे झाल्यामुळे पत्नीच्या मृतदेहाचे 57 तुकडे केल्याचे आरोपी पत्नीने सांगितले. बिरबल प्रसाद (वय ७६) या सेवानिवृत्त शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…