पुणे शहरातील नागरिकांनी टेकडीवर घडलेल्या गुन्ह्याबाबत काय काळजी घ्यावी? याबाबत सूचना…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहर पोलिस बाणेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या बाणेर टेकडी येथे घडलेले गुन्हेच्या अनुषंगाने नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे, पोलिसांची भूमिका व कर्तव्ये, बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांची सुरक्षितता याबाबत मुरकुटे गार्डन व सोलर गार्डन या ठिकाणी बाणेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी भेट देऊन नागिरकांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्त यांनी […]
अधिक वाचा...मनोधैर्य योजना! ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित युवतीला नुकसान भरपाई…
पुणे : पुणे शहराजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित युवतीला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तिला विधी सेवा प्राधिकरणाकडून ‘मनोधैर्य’ योजने अंतर्गत पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाकडून याबाबतचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…
लातूर : लातूर शहरात राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालयात ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील असलेली १७ वर्षांची मुलगी अकरावी विज्ञान शाखेत शिकत होती. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात खोली नंबर २०५ मध्ये ती राहत […]
अधिक वाचा...भावनिक पोस्ट! आईची शेवटची आठवण आहे; चोराला केली नम्र विनंती…
पुणे : एका युवकाची दुचाकी चोरीला गेली असून, ती त्याच्या आईची शेवटची आठवण होती. सोशल मीडियावर युवकाने भावनिक पोस्ट केली असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. दुचाकी चोरीला गेल्याचे कळताच युवकाने चोराला भावनिक आवाहन करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘दसऱ्याच्या दिवशी माझी काळी ॲक्टिव्हा गाडी चोरीला गेली. ती माझ्या आईची गाडी होती. आई […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…
मुंबईः मुलाला रिक्षावाले आणि फेरीवाले लाथा-बुक्क्यांनी तुडवत आहे. लेकाला वाचवण्यासाठी आई त्यांच्या अंगावर पडली तर बाप हात जोडून विनवण्या करत होता. पण, मारहाण करणाऱ्यांना किव आली नाही. अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तीला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी मारहाण केली, त्याचा मृत्यू झाला. आकाश माईन असे त्याचे नाव असून, तो मनसेचा […]
अधिक वाचा...पुणे शहरात एकाला नकली नोटांसह सहकारनगर पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपयाच्या एकुण २५० नकली चलनी नोटा जप्त केल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे यांचे आदेशाने सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार असे सहकारनगर पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलींग […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…
पुणेः पुणे जिल्ह्यातील पौड (ता. मुळशी) येथील विठ्ठलवाडी फाटा (ओंबळेवाडा) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराला पाठलाग करून पकडले. मात्र, चोराचा पाठलाग करताना धावपळ झाल्यामुळे हृदयविकाराने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय अंकुश ओबळे (वय २७) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी फाटा येथे राजेंद्र ओंबळे हे मंगळवारी रात्री झोपले […]
अधिक वाचा...Video : मुलाच्या हातातून मोबाईल घेतला अन् त्याने आईच्या डोक्यात घातली बॅट…
मुंबई : मोबाईल युगात अनेकजण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मोठ्यांचे पाहून लहान मुलेही अनुकरण करायला लागली आहेत. हल्लीच्या मुलांचा निरागसपणा मोबाईल फोनने हिरावून घेतला आहे. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं मोबाईलमध्ये वेळ घालवताना दिसतात. यामुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होताना दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…
नाशिक : नाशिक शहरातील सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका युवकाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोयता गँगने परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये अॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात धावत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ४५ वर्षांच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बस चालकाने सहा वर्ष चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसापासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी हा एका नामांकित शाळेतील […]
अधिक वाचा...
