
पुणे शहरातील कात्रज चौकातील उड्डाण पुलाचे कामामुळे वाहतूकीत बदल…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे कात्रज चौकात येणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूकीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. ०३/१२/२०२४ रोजी पासुन पुढील आदेशापर्यंत कात्रज चौक परिसरातील वाहतूकीमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगीक तत्वावर बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अमोल झेंडे, पोलिस उप आयुक्त, वाहतूक, पुणे शहर यांनी दिली.
अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
कात्रज चौकामध्ये उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लाँचिंगचे काम करावयाचे असल्यामुळे खालील नमुद रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात येत आहे.
अ) जड़ / अवजड वाहने (डंपर, हायवा, मिक्सर, हेवी मोटर व्हेईकल्स, हेवी गुड्स मोटार व्हेईकल्स, हेवी
ट्रान्सपोर्ट व्हेईकल, ट्रेलर्स, कंटेनर्स, मल्टी अॅक्सल वाहने )
१) सातारा कडून जुना कात्रज बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडी पुल येथे प्रवेश बंद राहील.
२) साताऱ्या कडुन नविन बोगदा मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील
३) मुंबई कडून वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील
४) सोलापुर कडून हडपसर मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढेप्रवेश बंद राहील
५) सासवड कडुन मंतरवाडी मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना मंतरवाडी चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील
६) बोपदेव घाट कडुन कात्रज चौकाकडे येणाऱ्या वाहनांना खडी मशिन चौक पुढे प्रवेश बंद राहील
७) मार्केटयार्ड, गंगाधाम बिबवेवाडी मार्गे कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे प्रवेश बंद राहील
८) स्वारगेट कडुन कात्रज मार्गे साताऱ्या कडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील
(सुचना :- वरील मार्गावरील जड / अवजड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे.)
मंतरवाडी, उंड्री, पिसोळी भागातील स्थानिक जड वाहनांना रात्री २२.०० वा. ते ०४.०० वा, दरम्यान प्रवेश चालु राहील परंतु त्यांना इस्कॉन मंदिर चौकाचे पुढे कात्रज चौकाकडे प्रवेश बंद राहील.
ब) एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे आदेश
१) मुंबई कडुन वारजे मार्गे कात्रज चौकाकडे येणाऱ्या एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांना नवले पुल येथे प्रवेश बंद राहील
२) साताऱ्या कडुन स्वारगेट कडे येणाऱ्या एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांनी नवले पुलाखालुन उजवीकडे वळण घेवुन कात्रज येथुन स्वारगेट कडे जावे.
(टिप :- सिंहगड रोड वरील एस.टी.बसेस व ट्रॅव्हल्स वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वरील मार्गाचा वापर करावा)
क) मांगडेवाडी, दत्तवाडी, हांडेवाडी व कात्रज परिसरातील नागरिकांनी स्वारगेट कडे जाण्यासाठी शक्यतो कात्रज चौका कडे न जाता इतर उपलब्ध पर्यायी मार्गाचा जास्तित जास्त वापर करावा.

निखील पिंगळे यांची गुन्हे शाखा उपायुक्तपदी नियुक्ती; अमोल झेंडे यांच्याकडे वाहतूक विभाग…
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
पुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…


