
शर्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू…
गोंदिया: शर्टच्या खिशात मोबाईलचा स्फोट झाल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे. नत्थु गायकवाड असे जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. गोंदियातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. दोघेही भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील रहिवासी आहेत. एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक खिशातल्या मोबाईलचा स्फोट झाला आणि ही दुर्घटना घडली. नत्थु यांच्यावर जिल्ह्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संग्रामे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, मोबाईलची बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
परभणीतील एकाच कुटुंबातील तिघांच्या सामूहिक आत्महत्येचे गुढ उकलले; धक्कादायक माहिती समोर…
टेम्पोची विद्यार्थिनीला जोरात धडक; उपचारापूर्वीच मृत्यू…
सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…
कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन…
मुळशी हळहळली! विवाहापूर्वी पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू…

