
जळगावमध्ये गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत स्फोट अन् झाल्या चिंधड्या…
जळगाव : धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या १०८ या ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे अवशेष दीडशे फूट उंच उडाले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत.
धरणगाव येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ ॲम्बुलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत होती. महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गियर बदल करीत असताना आगीची ठिणगी उडाली. काही तरी गडबड असल्याचा अंदाज आल्याने चालक राहूल बाविस्कर यांनी वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. वाहनातील डॉ.रफिक अन्सारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांना खाली उतरविले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्बुलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात रवाना केले. वाहन काही अंतरावर पुढे सरकताच ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा जोरात स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या चिंधड्या उडाल्या.
स्फोट व आगीचे दृश्य इतके भयंकर होते की बघणाऱ्यांचाही थरकाप उडत होता. आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले. या घटनेमुळे महामार्ग काही काळ बंद झाला होता. ज्या ॲम्बुलन्सचा स्फोट झाला ती दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या ताफ्यात होती, अशी माहिती १०८ चे व्यवस्थापक राहुल जैन यांनी दिली. सुदैवाने त्यावेळी काही घटना घडली नाही. एक सिलिंडर ऑक्सिजनने भरलेले होते तर दुसरे रिकामे होते. भरलेल्या सिलिंडरचे स्फोटामुळे तुकडे-तुकडे झाले आहेत.
सलूनमध्ये बसून मसाज करणाऱ्या व्यक्तीचा भयानक Video…
बीडमध्ये भीषण अपघात; रुग्णवाहिकेतील चौघांचा तर ट्रॅव्हल्समधील सहा जणांचा मृत्यू…
Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…
Video: उकळत्या दुधाच्या कढईवर गेला तोल अन् गेला जीव…
निवडणूक आयोगाच्या भरारी पथकातील लाच घेणारे पाच अधिकारी निलंबीत…

