
कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेनं दोन घटनांत पाच जणांचा मृत्यू; दोन सख्खे भाऊ अन् दोन…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात विषबाधेच्या दोन घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुरगूडमध्ये दोन चिमुकल्यांचा अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे तर करवीर तालुक्यातील मांडरे गावात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मांडरेतील दोन भावांच्या वडिलांचाही पंधरा दिवसांपूर्वी विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. या विषबाधेच्या घटनेमुळे कोल्हापूर हादरले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुरगूडच्या चिमगाव येथील रणजित आंगज हे पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होते. मात्र काही वर्षांपूर्वी ते पत्नी व काव्या, श्रीयांश या दोन मुलांसह मूळ गाव चिमगाव येथे राहण्यास आले. रणजित आंगज हे मुरगूड येथील एका रुग्णालयात काम करत होते. नातलगांनी घरी आणलेला कप केक दोन्ही मुलांनी खाल्ला होता. यांनातर उलट्या आणि जुलाब सुरू झाले होते.
दोन्ही मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना मुरगूडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी काव्याला रुग्णालयात दाखल करून श्रीयांश याची तब्येत चांगली असल्याने त्यास घरी सोडले होते. काव्यावर उपचार सुरू करण्यात आले. श्रीयांश याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला तत्काळ मुरगूडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मांडरे येथे पाटील कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाली होती. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पांडुरंग विठ्ठल पाटील यांचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. आता कृष्णा पांडुरंग पाटील व रोहित पांडुरंग पाटील या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर पाटील यांच्या घरातील प्रदीप पाटील यांची प्रकृती देखील चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, विषबाधेने मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर हादरले! मामानेच केली भाचीची अत्याचारानंतर हत्या; डोळा बाहेर…
कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…
कोल्हापूरमध्ये कोयना एक्स्प्रेसखाली चिरडून दोन महिलांसह तिघींचा मृत्यू…
कोल्हापूर हादरले! मुलाने सुऱ्याने वार करत केली आईची हत्या…
कोल्हापूरमध्ये रोहित शर्मा आऊट झाल्यामुळे वृद्धाचे फोडलं डोक…

