
खासगी बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू…
चित्रदुर्ग (कर्नाटक): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जखमींमधील काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात असताना विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. याच वेळी समोरून येणाऱ्या या बसला लॉरीची जोरदार धडक बसली. धडकेनंतर बसने पेट घेतला. या भीषण अपघातात गाढ झोपलेल्या दहा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने हिरियुर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हिरियुरहून बेंगळुरूकडे जाणारी लॉरी रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि बसशी धडकली, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला. या अपघातानंतर नऊ जणांनी सुखरुप बसमधून स्वत:ची सुटका केली. मात्र हा सगळा प्रकार इतक्या कमी वेळात घडला की, इतर प्रवाशांना आपला जीव वाचवता आला नाही.
अपघातानंतर काही महामार्गावर पेटलेली बस दिसत होती. पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
खासगी बसला मोटरसायकलने दिली धडक; 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…
राजस्थानमध्ये एसी स्लीपर बसला आग; 20 जणांचा होरपळून मृत्यू…
पुणे! चहाच्या टपरीवर सिलिंडरचा स्फोट; अनाथ संतोष पहिल्याच दिवशी होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! मेडिकल कॉलेजला लागलेल्या भीषण आगीत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

