जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत. गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. […]

अधिक वाचा...

महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…

वाशिम : महाराष्ट्राचा सुपुत्र आणि वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे जवान आकाश काकाराव अढागळे वीरमरण आले आहे. 6 सप्टेंबर रोजी काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना हिमस्खलन होऊन त्यांचा उंच डोंगरावरून 1 हजार फुटाहुन अधिक खोल दरीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर लष्करी इस्पितळात औषधोपचार सुरू होते. मात्र, रविवारी (ता. […]

अधिक वाचा...

भारती विद्यापीठ पोलिसांनी सराईत वाहन चोरास शिताफीने केली अटक…

पुणे (संदीप कद्रे): भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी करत सराईत वाहन चोरास शिताफीने अटक करुन त्याच्याकडून चोरीची ५ दुचाकी वाहने जप्त केली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारती विदयापीठ पोलिस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व पोलिस अंमलदार हे […]

अधिक वाचा...

गणेशोत्सवासाठी राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांची बैठक…

मुंबई : गणेश उत्सव 2023 बाबत राज्य महामार्ग वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (ता. 5 ) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध निर्णय घेण्यात आले. गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर काय करता येईल आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत बैठकीत चर्चा झाली. विविध ठिकाणी सुविधा केंद्र तयार […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…

जालना: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी यापूर्वी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…

जालनाः जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार […]

अधिक वाचा...

जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…

जालना : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. दगडफेकीत 37 पोलिस जखमी झाले असून, यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश आहे. अंतरवाली सराटी प्रकरणी 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा...

Video: ‘मुळशी पॅटर्न’चा थरारानंतर पोलिसांनी काढली गुंडांची धिंड…

नाशिक : ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाच्या कथानकानुसार जीवे मारण्याची धमकी देऊन जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून 13 आरोपी फरार आहेत. या गुंडाची दहशत कमी करण्यासाठी त्याच परिसरातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पिस्तूलाचा धाक […]

अधिक वाचा...

आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल…

हिंगोली : शिंदे गटाचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवली होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार संतोष बांगर हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…

अहमदनगर: कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ती सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जेवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून, पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. श्रीगोंदा परिसरात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!