
भारतीय क्रिकेटपटूचा मैदानातच हृदयविकाराने मृत्यू…
बंगळूरु : क्रिकेटचा सामना खेळत असताना मैदानावर हृदयविकाराचा झटका आल्याने भारतीय क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. कर्नाटकचा माजी रणजी क्रिकेटर एस.एल. अक्षय (वय ३९) असे खेळाडूचे नाव आहे. बंगळूरुमध्ये रविवारी स्थानिक डिव्हिजन क्रिकेटचा सामना खेळत असताना अक्षयला हृदयविकाराचा झटका आला.
अक्षयने याआधी रणजी ट्रॉफीमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केलं होते, तसंच तो कर्नाटक प्रीमियर लीगचाही भाग होता. ही स्पर्धा आता महाराजा ट्रॉफी केएससीए टी-20 म्हणूनही ओळखली जाते. शिवमोग्गा येथील रहिवासी असलेला अक्षय केआर पूरम येथील मैदानावर थर्ड डिव्हिजनचा सामना खेळत होता, तेव्हा त्याच्या छातीत अचानक दुखायला लागलं. यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
View this post on Instagram
अक्षयने 4 ओव्हर बॉलिंग केली, पण त्यानंतर त्याला लगेचच अस्वस्थ वाटू लागले होते. अक्षयच्या अचानक झालेल्या मृत्यूने कर्नाटकचे अनेक माजी खेळाडू आणि अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (KSCA) देखील अक्षयच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. तसंच तरुण खेळाडूंना घडवण्यात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात अक्षयने बजावलेल्या भूमिकेचं क्रिकेट संघटनेने कौतुक केले आहे.
‘अक्षयने प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटकचे उत्कृष्ट प्रतिनिधित्व केलं आणि खेळाडू म्हणून करिअर संपल्यानंतरही त्याने खेळाची सेवा सुरू ठेवली. ज्युनिअर लेव्हल प्रशिक्षक म्हणून त्याने तरुण क्रिकेटपटूंना घडवण्यात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने राज्यातील क्रिकेटवर स्वत:चा ठसा उमटवला’, असे KSCA ने म्हटले आहे.
हृदयद्रावक! पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी जाऊन घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! उच्चशिक्षित महिलेने विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य…
हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! लग्नाच्या पत्रिकेवर ज्याचं नाव त्याच मुलावर अंत्यसंस्काराची वेळ…
हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…

