पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

पुणे : पुणे शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नवीन ५ पोलिस ठाणे देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उदघाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली. “एमएसव्ही म्हणजे एक छोटं पोलिस आयुक्तालय म्हणून काम करतील. पाच पोलिस ठाणे एकाचे उद्घाटन आणि ४ चे भूमिपूजन केले. पुण्याने ७ पोलिस ठाणे मागितले एका झटक्यात आम्ही पोलिस ठाणे मंजूर केले आणि ८०० जणांचा स्टाफ मंजूर केला. पुण्याचं काही आलं तर मी आणि अजितदादा हो म्हणतो, मी घोषणा करतो की, अजून नवीन ५ पोलिस ठाणे पुण्याला देऊ आणि १००० लोकांचा स्टाफ मंजूर करू, पुण्याला २ पोलिस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

‘१० वर्षांपूर्वी ऑगस्ट २०१५ मध्ये पुण्यातील सीसीटीव्ही पहिला फेज सुरू केला. देशातील सर्वात आधुनिक cctv प्रणालीचे उद्घाटन पुण्यात होत आहे. अत्याधुनिक कॅमेरा, नाइट व्हिजन कॅमेरा आहेत. कायदा आणि सुव्यवस्था, गुन्हेगारांचे ट्रॅकिंग, ट्रॅफिकचे नियोजन या प्रणालीमधून करण्यात येतील. एखादा व्यक्ती करून पसार झाला तर त्याला तात्काळ पकडण्यात येईल. अनेक ब्लॅक स्पॉट आहेत. तिथे पोलिसिंग करणे सोपं नाही, त्यातील पहिलं बोपदेव घाट याचं काम झालं आहे. पुढील २ महिन्यात इतर टेकड्यांवरचे काम पूर्ण होईल’ असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

‘कमांड अँड कंट्रोलचे अवलोकन करताना अजितदादा यांनी प्रश्न उपस्थित केला की, कॅमेरा बंद पडला तर काय, तर त्याचा तत्काळ अलर्ट मिळेल आणि आदेश दिले आहेत की २४ तासात तो बंद झालेला कॅमेरा पुन्हा सुरू करायचा आहे. आयुक्त यांना सूचना आहे की, रोज त्यावर एक दिवस या प्रणालीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा वाजवा म्हणजे ती सिस्टिम चालू आहे का नाही हे कळेल. पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. ५०३ चौकात एक आयटी एमएस सिस्टम उभी करत आहोत. संपूर्ण ट्रॅफिक चे simulation आपण करणार आहोत, ट्रॅफिकचा वेग सुद्धा आता वाढणार आहे, वाहतूक diversion सुद्धा करण्यात येईल, अनेक उपाययोजना आपण करणार आहोत. पुण्यासाठी इकॉनॉमिक प्लॅन सुद्धा नीती आयोगाच्या सह्यायाने केला आहे.” असेही फडणवीस म्हणाले.

प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ अन् फोटो…

पुणे! Z ब्रीजजवळ भडकलं टोळीयुद्ध, कोयत्याने प्राणघातक हल्ला…

पुणे पोलिसांनी तीन युवतींचा छळ केल्याचा आरोप; पाहा घटनाक्रम…

पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…

पुणे! दरोडेखोरांकडून वॉकी-टॉकीचा वापर; १२०० किलोमीटरपर्यंत माग काढत केली अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!