
भाजप नेत्याची गाडी अडवल्याची पोलिसकाकाला शिक्षा…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप माजी नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याने पीएसआयची कंट्रोल रूमला बदली करण्यात आल्याचा प्रकार समोर आहे. पोलिसकाकाला कर्तव्य बजावल्याची शिक्षा मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या रॅलीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. शिवजयंतीला भाजप माजी नगरसेवकाला साईड न जाऊ देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली आहे. पोलिसांना कर्तव्य बजावण्याची शिक्षा मिळाली आहे. पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांची पीएसआय सचिन मिरधे यांनी कंट्रोलला बदली केली आहे.
शिवजयंतीच्या दिवशी मोटार सायकल रॅली भाजपा माजी नगरसेवक अनिल मकरिये हे विरुद्ध दिशेने जाऊ द्या अशी मागणी करत होते. पोलिसांनी अडवल्याने पोलिसांसोबत हुज्जत घातली. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र, भाजप नगरसेवकाला विरुद्ध दिशेने जाऊ न दिल्याची आणि कर्तव्य बजावल्याची पीएसआयला शिक्षा मिळाली आहे, त्यांची कंट्रोलला बदली केली असल्यामुळे पोलिस दलासह नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
भाजप नेत्याची पोलिसांना धमकी, व्हिडिओ व्हायरल…
भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…
पोलिसकाकावर हात उचलणं भाजप आमदार सुनील कांबळे यांना भोवलं…
भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?

