अहिल्यानगरच्या पोलिस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड फुटला हातात; बोटाच्या चिंधड्या…

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली आहे. मॉक ड्रिल (Mock Drill) हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असताना, एका हँडग्रेनेडचा हातातच भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका भयानक होता की, यात दोन कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. आज (सोमवार) सकाळी 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात नेहमीप्रमाणे प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होते. सकाळी 10 वाजता पोलिस कर्मचाऱ्यांना हँडग्रेनेड कसा हाताळावा, याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली जात होती. मात्र, ही माहिती दिली जात असतानाच अचानक एका हँडग्रेनेडचा हातातच स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी दोघांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. तर इतर दोन कर्मचारी या घटनेत किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पोलिस वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

घटनेनंतर संपूर्ण पोलिस मुख्यालयात एकच पळापळ आणि गोंधळ उडाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात झालेला स्फोट हा स्मोक हँडग्रेनेड फुटल्यामुळे झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जमाव पांगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या ग्रॅनाईडची पीन काढल्यानंतर संबंधित जवानांकडून लिव्हर सुटल्याने हा अपघाती स्फोट झाल्याची माहिती राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांनी दिली आहे.

‘मॉक ड्रील सुरू होती, त्यावेळी आमच्या हातात हँड ग्रेनेड दिले होते. पण, आम्ही हँड ग्रेनेडची पिन काढली आणि ग्रेनेड फेकण्याऐवजी हातातच ठेवला. त्यामुळे स्फोट झाला. या स्फोटात आम्ही चार जण जखमी झालो. हाताची करंगळीच बाजूला झाली आहे. चेहऱ्यांना दुखापत झाली आहे, अशी प्रतिक्रिया जखमी कर्मचारी शुभम कावरे यांनी दिली.

नागपूर! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू…

पुणे जिल्ह्यातील जगदंबा हॉटेलमध्ये भीषण स्फोट; 10 कर्मचारी भाजले…

पुणे बॉम्ब स्फोटातील जामिनावरील आरोपीची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या…

दिल्ली बॉम्ब स्फोट! लाल किल्ल्याजवळ चुकून ट्रिगर दाबलं; धक्कादायक माहिती समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!