Google Mapचा आधार पडला महागात; दोन युवतींचा तडफडून मृत्यू…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्यानंतर कारचं लॉक बंद झाल्याने कारमधील चारही जण बराच वेळ वेदनेने तडफडत राहिले. या अपघातात दोन युवतींचा जागीच मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे शुक्रवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-लखनऊ महामार्गावर हा भीषण अपघात घडला. नैनितालला भेट देऊन घरी परतणाऱ्या चार जणांच्या कारला सिमेंट पाईपने भरलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातात सिमरन (वय १८) आणि शिवानी (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल आणि संजू दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक गूगल मॅपद्वारे दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करत होता. मुरादाबाद बायपासकडे वळताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर गाडी लॉक झाल्यामुळे दोन तरुण आणि दोन तरुणी गाडीत अडकले. त्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. या अपघातात दोन्ही युवतींचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोस्टमॉर्टमनंतर मुलींचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. कारमधील सर्वजण शॉर्टकट घेण्यासाठी गूगल मॅपचा आधार घेत होते, त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

भीषण अपघात! नांदेडमध्ये मजुरांनी भरलेला ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, 8 जणांचा मृत्यू…

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

सांगलीत भीषण अपघातात सातारा जिल्ह्यातील दाम्पत्याचा मृत्यू, पाच जखमी…

महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू…

वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तीन मित्रांचा अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!