
लातूर! नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडलं अन् पत्नीने उचलले मोठे पाऊल…
लातूर: एका पत्नीला आपल्याच पतीचे दसऱ्या महिलेसोबत मोबाईल फोनवर बोलतानाचे चॅट्स सापडले. ते चॅट्स पाहून महिलेनं दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरवंती गावात घडली आहे. आरती रामेश्वर उरगंडे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
एक वर्षांपासून सुरु असलेल्या या छळामुळे आरती त्रस्त झाली होती. पती आणि सासरे तिला बेदम मारहाण करत छळ करायचे, नंतर ती तिच्या कुटुंबाला फोनद्वारे संपर्क करायची. आरती जेव्हा तिच्या आई वडिलांच्या घरी जायची तेव्हा तिचा पती रामेश्वर फोन करून तिला शिवीगाळ करायचा. आरतीच्या पालकांनी वारंवार, तिचा पती, आरती आणि सासरे स्वत: तिच्या आईला भेटण्यासाठी विवेकानंद रुग्णालयात आले होते. रुग्णालयात आल्यानंतर आरतीने आई आणि वडिलांनी अश्रू ढाळत सांगितलं की, तिचा पती हा रामेश्वर हा दुसऱ्या महिलेशी व्हॅट्सअॅपवर चॅट करत होता. आरतीने याबाबत रामेश्वरला विचारले असता, तिच्या पतीने तिला मारहाण केली आणि नंतर शिवीगाळ केली.

आरतीचे वडील हे तिच्या घरी गेले आणि नंतर त्यांना तिचा पती रामेश्वर कुऱ्हाडीने दरवाजा तोडताना आढळून आला होता. सिद्धेश्वर आणि तिची सासू एकमेकांच्या शेजारील असलेल्या बेडवर बसली होती. दरवाजा तोडण्यात आल्यानंतर आरतीच्या वडिलांना दिसलं की, आरतीने पंख्याला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
या घटनेनंतर आरतीच्या वडिलांनी राजेंद्र दातेकर यांच्या तक्रारीवरून आरपीचा पती रामेश्वर उरगुंडे आणि सारसे सिद्धेश्वर उरगुंडे यांच्याविरुद्ध लातूर शहरातील एमआडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 108, 85, 115, 352. 3 (5) अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
लातूर! धाब्यावर चिकन अन् दारू पाजली अन् जाळून मारलं पण कानून के हात लंबे होते है…
लातूर! फ्रेशर्स पार्टीत डान्स करताना एकमेकांना धक्का लागला अन् जीव गेला…
लातूर! प्रियकरासोबत केला लॉजवर प्लॅन अन् पती दिसताच…
लातूरमध्ये भरदिवसा शिक्षकाची छातीत सुरा खुपसून हत्या…
लातूर-सोलापूर महामार्गावर रक्तरंजित थरार; एकाची हत्या तर मैत्रिणीच्या छातीत खुपसला चाकू…

