Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवर असणाऱ्या एका पबमध्ये काही युवक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत पब सील करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा...

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये धनिक पुत्राने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दोघांचा बळी घेतल्यानंतर अल्पवयीन मुलाला निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा सुनावून जामीन मंजूर केला होता. यानंतर गदारोळ उडाला होता. बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून पुष्कळ चुका करण्यात आल्याचा अहवाल महिला अणि बाल विकास विभागाने नेमलेल्या चौकशी समितीने दिला आहे. त्यानंतर या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे धनिकपुत्राने वेगाने महागडी पोर्शे कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर दररोज नवनवीन घडामोड घडत आहे. अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल यांना पुणे क्राइम ब्रांचने अटक केली आहे. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अगरवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे […]

अधिक वाचा...

यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीला जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मेंडकीपुरा यवतमाळ येथे 3 एप्रिल 2023 रोजी देवांशु याचा खुन झाल्याची घटना समोर आली होती. त्यात यवतमाळ शहर पोलिस स्टेशन येथील पोलिसांनी चौकशी करून मृतकाचे वडीलांच्या रिपोर्ट वरुन भादंवि. कलम 302 अंतर्गत आरोपी शेख समीर शेख जमीर विरूद्ध गुन्हा नोंदविला होता. सदर प्रथमदर्शी अहवालानुसार शहर पोलिसांनी तपास करून यवतमाळच्या जिल्हा […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांसह वॉर्डबॉयचे निलंबन…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणाचे धागेदोरे आता ससून हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहे. या प्रकरणी आता ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी 2 डॉक्टर आणि वॉर्ड बॉयचे निलंबन करण्यात आले आहे. डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि वॉर्डबॉय अतुल घटकांबळेवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात वरिष्ठ डॉक्टरांनीही गैरकृत्य केल्याचा प्रकार […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांचे हायटेक पाऊल! AI द्वारे जिवंत करणार पोर्शे अपघाताची घटना…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) मदतीने प्रत्यक्ष अपघाताचा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी ‘एआय’मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे. कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान पोर्शे […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार वेगाने चालवत अल्पवीयन धनिक पुत्राने दोघांना चिरडले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला काही अटींवर जामीन झाला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटी आणि जामीन प्रक्रिया या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. पोर्शे कार […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…

पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाललाआता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अगरवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघातातील गुन्ह्यांमधील कलमांमध्ये वाढ…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात धनिक अल्पवयीन पुत्राने भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना घडल्यानंतर आणि आरोपीला लगेचच जामीन मिळाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. पुढे, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोर्शे कार […]

अधिक वाचा...

लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : लाचेची मागणी केल्या प्रकरणी आर्णी पंचायत समितीचे ग्रामसेवक महेश मंचलवार (48 वारको सिटी यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेचे पंचायत विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी रामदास चंदनकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अंतर्गत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!