
धक्कादायक! झोपेत असताना पती, पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या..
पाटणा (बिहार): घरात झोपलेल्या पती, पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना बेगुसराय येथील बछवाड़ा पोलिस स्टेशन हद्दीतील रसीदपूर पंचायतीच्या चक्का वॉर्ड क्रमांक 12 मध्ये घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
बेगुसरायच्या बछवाड़ा येथे पती, पत्नी आणि मुलीची अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली आहे. सुदैवाने मुलगा बचावला आहे. मृतांमध्ये सजीवन सिंग (32 वर्ष), त्यांची पत्नी संजिता देवी (32 वर्ष) आणि त्यांची मुलगी सपना (8 वर्ष) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमी मुलगा अंकुश अवघा सहा वर्षांचा आहे.
मिळालेल्या महितीनुसार, रात्रीचे जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंब झोपी गेले होते. अज्ञात व्यक्तीने झोपेत असलेल्याच तिघांची गळा चिरून हत्या केली. तसेच मृताच्या मुलाच्या हत्येचाही प्रयत्न केला गेला. मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. गावकऱ्यांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याची स्थानिक चर्चा आहे. त्यांना मारणारेही स्थानिक आहेत. हत्येचे कारण आणि मारेकऱ्यांची ओळख याबाबत सध्या पोलिस काहीही उघड करत नाहीत. बछवाड़ा पोलिस हे प्रकरण लवकरच उघडकीस आणणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…
UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
एकतर्फी प्रेम! बीएचएमएसच्या विद्यार्थिनीची धमक्यांना कंटाळून आत्महत्या…
वरळी स्पा सेंटर हत्याकांडात मोठं ट्विस्ट आले समोर…
‘सैराट’ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

