हृदयद्रावक! तलावाजवळ मुलांची कपडे दिसली अन् फुटला हंबरडा…

छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक गुरुवारी (ता. ११) दुपारी घडली आहे. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12), अफरोज जावेद शेख (वय 12), जावेद शेख (वय 14), अबरार जावेद शेख (वय 12) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावे आहेत. यामळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुलं पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले आहे. मात्र, या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर या मुलांचा मृतदेह शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते. मात्र, सायंकाळ होऊन देखील ते परतले नव्हते. मुलं घरी का परत आली नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसली. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलिस व गावात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या शोधकार्यानंतर मुलांचा मृतदेह मिळून आले. मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.

हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!