
बायकोनं नवऱ्याच्या डोळ्यात जोरात खुपसली कात्री; कारण पाहा…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवऱ्याने चहाची तलप झाली म्हणून पत्नीकडे चहाची मागणी केली. चहावरुन पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने रागाच्या भरात थेट नवऱ्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली. या घटनेच नवरा गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पतीच्या डोळ्यांत कात्री खुपसल्यानंतर पतीला रक्तबंबाळ अवस्थेत टाकून पत्नी फरार झाली आहे. याप्रकरणी पती अंकितने पत्नी प्रियंकाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बरुत पोलिसांनी प्रियांकाविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिस महिलेचा शोध घेत आहेत. पती-पत्नीमध्ये यापूर्वीही भांडणे होत होती. पत्नीने पतीविरोधात पोलिसात कौटुंबिक हिंचाराची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या दोघांनाही समज दिली होती. अंकित आणि प्रियंका यांच्यातील वादाची सद्या चर्चा सुरु आहे.
दरम्यान, बडोली रोड येथील अंकित याचे तीन वर्षांपूर्वी रामाळा पोलिस ठाणे हद्दीतील सूप गावात राहणाऱ्या प्रियंका हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद, मारामारी सुरू होती. बुधवारी पत्नीला चहा मागितला असता पत्नीने रागाच्या भरात खोलीतील कात्री उचलून खाटेवर बसलेल्या पती अंकितच्या डोळ्यात वार केले. त्यामुळे अंकितला रक्तस्त्राव होऊन तो जमिनीवर पडला. आवाज ऐकून युवकाची वहिनी व मुलांनी तेथे धाव घेत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तरुणाची पत्नी घरातून पळून गेली. जखमी अंकित याच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नवरीने म्हणाली, माझा नवरा नामर्द; वैद्यकीय तपासणी केली…
पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…
पत्नी आणि तिच्या मैत्रिणीने दारू संपवल्यामुळे नवरा चिडला अन्…
वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…
धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

